Obesity : लहानग्यांमधील लठ्ठपणासारख्या समस्येवर मात करण्यासाठी वाडिया हॉस्पिटलचा खास उपक्रम

| Updated on: Mar 05, 2022 | 8:41 PM

मैदानी खेळांची जागा आता व्हिडिओ गेम्स, मोबाई फोन, कम्प्युटर यांनी घेतली असून व्यायामाच्या अभावी लठ्ठपणासारखी समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लठ्ठपणासारख्या आजाराविषयी जागरुकता वाढवणे, त्यावर मात करण्यासाठी पालक तसेच मुलांना विविध माध्यमातून प्रोत्साहन देणे आणि लठ्ठपणाबद्दलचे अनुभव सादर करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 4 मार्च रोजी जागतिक लठ्ठपणा दिवस साजरा केला जातो.

Obesity : लहानग्यांमधील लठ्ठपणासारख्या समस्येवर मात करण्यासाठी वाडिया हॉस्पिटलचा खास उपक्रम
लहानग्यांमधील लठ्ठपणासारख्या समस्येवर मात करण्यासाठी वाडिया हॉस्पिटलचा खास उपक्रम
Follow us on

मुंबई : थोरा-मोठ्यांबरोबरच आता लठ्ठपणा (Obesity)ची समस्या लहान मुलांमध्येही तितक्याच वेगाचे वाढत असल्याचे दिसून येत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती (Awareness) तसेच पालकांना शिक्षीत करणे आवश्यक आहे. जागतिक लठ्ठपणा दिनानिमित्ताने परेल येथील बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनच्या वतीने 28 फेबृवारी ते 4 मार्च दरम्यान मोफत तपासणी (Free Check Up) आणि समुपदेशन उपक्रमाचे आयोजन केले होते. तर 5 मार्चला लहान वयात उद्भभवारा लठ्ठपणा या विषयावरील सत्राने उपक्रमाची सांगता करण्यात आली. यामघ्ये 50हून अधिक लठ्ठ बालक आणि त्यांच्या पालकांनी सहभागी दर्शविला होता. (Wadia Hospital’s special initiative to overcome the problem of childhood obesity)

जागतिक लठ्ठपणा दिवस साजरा

लठ्ठपणा हा एक असा आजार आहे की जो इतर आजारांना आमंत्रण देतो तसेच आरोग्याविषयक समस्या निर्माण होण्याचा धोका देखील वाढतो. हवाबंद डब्यातील पदार्थ, जंक फुडचा मारा आणि शर्करायुक्त शीतपेयांचे सेवन हे मुलांच्या आरोग्यासाठी घातक ठरत आहे. मैदानी खेळांची जागा आता व्हिडिओ गेम्स, मोबाई फोन, कम्प्युटर यांनी घेतली असून व्यायामाच्या अभावी लठ्ठपणासारखी समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लठ्ठपणासारख्या आजाराविषयी जागरुकता वाढवणे, त्यावर मात करण्यासाठी पालक तसेच मुलांना विविध माध्यमातून प्रोत्साहन देणे आणि लठ्ठपणाबद्दलचे अनुभव सादर करण्याच्या उद्देशाने दरवर्षी 4 मार्च रोजी जागतिक लठ्ठपणा दिवस साजरा केला जातो.

मुलांमधील लठ्ठपणा दूर करण्यासाठी वाडिया रुग्णालयाचा विशेष उपक्रम

“प्रत्येकाला कृती करण्याची गरज आहे” ही या वर्षीच्या जागतिक लठ्ठपणा दिनाची संकल्पना असून लठ्ठपणावर मात करण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर कृती करण्याची गरज आहे आणि हे सत्य स्वीकारून बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला यामध्ये योगदान देण्याची गरज आहे. या महत्त्वाच्या दिवशी बाई जेरबाई वाडिया हॉस्पिटल फॉर चिल्ड्रेनने लहान मुलांमधील लठ्ठपणा दूर करण्यासाठी एक विशेष उपक्रम हाती घेतला असून या समस्येशी लढा देण्याकरीता पालक तसेच मुलांमध्ये जनजागृती घडविण्याचा ध्यास घेतला आहे.

लठ्ठपणाच्या दुष्परिणामांबद्दल मुलांना आणि पालकांना शिक्षित करण्यात आले

लठ्ठपणाच्या दुष्परिणामांबद्दल मुलांना आणि त्यांच्या पालकांना या माध्यमातून शिक्षित करण्यात आले. त्यांना व्यायाम कसा करायचा आणि किती करायचा याविषयी देखील माहिती देखील देण्यात आली. मुले आणि पालकांना मनोरंजनात्मक खेळातून, उपक्रमातून व्यायामाचा आनंद कसा घेतला येईल याविषयी तज्ञांनी मार्गदर्शनही केले. कोरोना सारख्या साथीच्या रोगाच्या काळात लठ्ठपणाच्या घटनांमध्ये तीव्र वाढ झाली आहे. मुलांना गेल्या 2 वर्षांपासून घरीच राहावे लागत होते आणि त्यामुळे शारीरीक हलचालींवर बंधने आल्याने व्यायामाअभावी आणि खाण्याच्या चुकीच्या सवयीमुळे अनेकांचे वजन वाढले होते. आता शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर मुलांना नवीन वेळापत्रकात जुळवून घेताना तणावासारख्या इतर समस्यांनाही तोंड द्यावे लागत आहे. विद्यार्थी नियोजित आणि शिस्तबद्ध दिनचर्या पाळण्यात अक्षम ठरत आहेत ज्यामुळे त्यांचे आरोग्य आणखी बिघडू शकते. वाडिया हॉस्पिटल मुलांच्या कल्याणासाठी झटत असून लहान मुलांच्या लठ्ठपणा व्यवस्थापनाकरिता विविध उपक्रमही हाती घेतल्याची माहिती वाडिया हॉस्पिटलच्या सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी स्पष्ट केले. (Wadia Hospital’s special initiative to overcome the problem of childhood obesity)

इतर बातम्या

Cancer patient ठणठणीत..! डॉक्टर म्हणाले होते, 8 महिन्यांत मरशील! नेमकं काय Follow केलं त्यानं? वाचा सविस्तर

महिलांपेक्षा पुरूषांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण अधिक, कारण तुम्हाला माहिती आहे का ?