कुकरची शिट्टी वाजवताच पाणी बाहेर येतं, एकदा करुन बघा असा जुगाड, किचन नाही होणार घाण

Pressure Cooker : आजच्या धकाधकीच्या जीवनात ऑफिस आणि अधिक वेळ प्रवासात जातो. ज्यामुळे घरी जाऊन सर्वकाही लवकर आवरण्यासाठी अनेक जण प्रेशर कुकरचा वापर करतात. पण अनेकदा कुकरची शिट्टी वाजवताच पाणी बाहेर येतं, त्यावर काही जुगाड करु पाहा...

कुकरची शिट्टी वाजवताच पाणी बाहेर येतं, एकदा करुन बघा असा जुगाड, किचन नाही होणार घाण
Updated on: Nov 30, 2025 | 1:40 PM

Pressure Cooker : ऑफिसमधून घरी गेल्यानंतर लवकर सर्वकाही आवरायचं म्हणून अनेक महिला प्रेशर कुकरचा वापर करतात. पदार्थ लवकर शिजवण्यासाठी प्रेशर कुकर हा सर्वोत्तम पर्याय आहे. तांदूळ, डाळ किंवा अनेक भाज्या शिजवण्यासाठी देखील प्रेशर कुकरचा वापर होतो. पण एक समस्या असते ती म्हणजे प्रेशर कुकरची शिट्टी वाजताच पाणी बाहेर पडू लागतं, जे किचनच्या ओट्य़ावर सांडतं. जर तुम्हाला ही समस्या येत असेल तर काळजी करण्याची गरज नाही. काही टिप्स फॉलो करा ज्यामुळे कुकरमधून पाणी बाहेर येणार नाही.

जर तुम्ही प्रेशर कुकरमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी घातलं तर ते उकळताना बाहेर पडू शकते. याशिवाय, आणखी एक प्रमुख कारण म्हणजे जर बीन्स किंवा तांदळाचे दाणे व्हिसल नोजलमध्ये अडकले तर वाफेचा मार्ग अडतो आणि पाणी इकडे तिकडे सांडू लागते.

तर यासाठी एक जुगाड आहे. गॅस कायम मंद आचेवर ठेवा… गॅस फास्ट केल्यास कुकरमध्ये लवकर दाब निर्माण होतो आणि पाणी लवकर बाहेर येतं. मध्यम आचेवर दाब वाढू द्या. एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे दर सहा महिन्यांनी रबर गॅस्केट बदलणं गरजेचं आहे.

जीर्ण झालेले गॅस्केट हे गळतीचे मुख्य कारण आहे. नवीन गॅस्केट बसवल्याने सील मजबूत होतो मिळतो. व्हिसल नोजल नेहमी स्वच्छ ठेवा. कारण ते मुख्य कारणांपैकी एक आहे. म्हणून प्रत्येक वापरानंतर टूथपिक किंवा पातळ ब्रशने नोजल स्वच्छ करा. जेणेकरून घाण साचणार नाही.

एवढंच नाही तर, कुकरमधून पाणी बाहेर येण्यापासून रोखण्यासाठी तुम्ही तेल वापरू शकता. काही वेळा कुकरच्या झाकणावरील रबर सैल होतो. त्यामुळे कुकरमधून पाणी बाहेर पडू लागतं. अशा परिस्थितीत तुम्ही कुकरचा रबर वेळोवेळी तपासून पाहा. असं केल्यास किचन खराब देखील होणार नाही.

कुकर खूप जुना असेल तर तळ वाकून सील नीट राहत नाही. त्यामुळे देखील पाणी बाहेर येतं. अशा स्थितीत कुकर बदलणे हाच एक योग्य उपाय आहे. जर कुकरमधून जास्तच पाणी येत असेल तर, ताबडतोब गॅस कमी करा आणि व्हिसल काढण्याचा प्रयत्न करू नका. प्रेशर कमी झाल्यावरच तपासणी करा.