
आपण अनेकदा रस्त्यावर, रेल्वे स्टेशनवर किंवा मंदिराबाहेर बसलेले भिकारी आणि साधू पाहतो. त्यांच्याकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे त्यांचे दाट, लांब केस आणि लांब दाढी. आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे लोक कोणतेही शॅम्पू, कंडिशनर किंवा हेअर स्पा न करताही त्यांचे केस अतिशय निरोगी दिसतात. याउलट, आपण महागड्या उत्पादनांवर हजारो रुपये खर्च करूनही केस गळणे, टक्कल पडणे या समस्येने त्रस्त असतो.
जर आपण पाहिले तर १०० टक्क्यांपैकी ९० टक्के भिकाऱ्यांच्या डोक्यावर घनदाट केस असतात. यामागे कोणते शास्त्रीय आणि जीवनशैलीशी संबंधित कारणे आहे का? याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत.
आपण केसांच्या स्वच्छतेसाठी जे शॅम्पू, कंडिशनर आणि सीरम वापरतो, त्यामध्ये सल्फेट आणि पॅराबेन्स सारखी घातक रसायने असतात. ही रसायने केसांच्या मुळांना कमकुवत करतात. याउलट, भिकारी क्वचितच केस धुतात. विशेष म्हणजे ते त्यासाठी शॅम्पू, कंडिशनर यातंल काहीही लावत नाही. त्यामुळे त्यांच्या केसांमधील नैसर्गिक तेल टिकून राहते, जे केसांच्या वाढीसाठी पोषक ठरते.
केसांच्या आरोग्यासाठी व्हिटॅमिन डी अत्यंत आवश्यक असते. आपण बहुतांश वेळ एसी ऑफिसमध्ये किंवा घरात घालवतो, ज्यामुळे आपल्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही. मात्र, भिकारी दिवसभर उन्हात असतात. त्यांच्या शरीरात सूर्यप्रकाशामुळे नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन डी तयार होते. ज्यामुळे त्यांचे केस आणि दाढी नैसर्गिकरित्या मजबूत होतात.
गरजेपेक्षा जास्त काळजी घेणे कधीकधी केसांसाठी हानिकारक ठरते. हेअर ड्रायर, स्ट्रेटनर, कलर करणे आणि वारंवार बदलली जाणारी उत्पादने यामुळे केसांच्या संरचनेचे नुकसान होते. भिकारी त्यांच्या केसांवर असे कोणतेही प्रयोग करत नाहीत. ज्यामुळे त्यांचे केस नैसर्गिक अवस्थेत राहून सुरक्षित राहतात.
4. तणावमुक्त जीवनशैली
केस गळण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे स्ट्रेस (तणाव). करिअर, पैसा आणि भविष्याची चिंता यामुळे सामान्य माणसाच्या शरीरात कोर्टिसोल हार्मोन वाढतो, जो केस गळण्यास कारणीभूत ठरतो. याउलट, भिकाऱ्यांचे जीवन हे मिळेल त्यात समाधान या वृत्तीवर चालते. नोकरी किंवा स्पर्धेचा ताण नसल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य तुलनेने स्थिर असते, ज्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या केसांच्या आरोग्यावर दिसून येतो.