
आजकाल वातावरणाचं काहीही सांगता येत नाही. कधी पाऊस तर कधी कडक ऊन पडतं. त्यामुळे ऑफिसला जाणाऱ्यांची प्रवासाने दमछाक तर होतेच पण सोबतच वातावरामुळे देखील त्रास होतो. बरं याचा परिणाम फक्त बाहेरच जाणवतो असं नाही तर ऑफिसमध्ये देखील जाणवतो त्यामुळे काहींना ऑफिसमध्ये एसी लागतो.तर काहींना एसी सहनही होत नाही. ज्यांना एसी सहन होत नाही त्यात मुलींची संख्या जास्त असते. कारण बऱ्याचदा एसी बंद करायला लावणाऱ्यांमध्ये मुलींची संख्या अधिक असते.
मुलींनी एसी फार वेळ सहन होत नाही. आणि बहुतेक ऑफिसमध्ये हेच घडत असतं. पण याचं कारण माहितीये का? चला जाणून घेऊयात याची काही कारणं. आणि तुमच्याही ऑफिसमध्ये अशीच परिस्थिती आहे का?
मुलींना एसीची हवा सहन न होण्याची कारणे
महिलांचे शरीरात अधिक उष्णता असते : पहिलं मुख्य कारण म्हणजे, पुरुषांच्या तुलनेत महिलांचे शरीर अधिक उष्णता राखण्याचा प्रयत्न करते. म्हणजे महिलांच्या शरीरात पुरुषांपेक्षा उष्णता जास्त असते. त्यामुळे महिलांना थंडी जास्त जाणवते. तसेच महिलांची त्वचा ही पुरुषांपेक्षा थोडी पातळ असते. त्यामुळे मुलींना थंडी जास्त प्रमाणात जाणवते.
हार्मोनल बदल : मुलींच्या शरीरात होणारे हार्मोनल बदल. महिलांच्या शरीरात असणारे हार्मोन हे शरीरातील तापमान नियंत्रावर परिणाम करतात. ज्यामुळे महिलांना एसीचा जास्त त्रास होतो
संवेदनशील त्वचा : तसेच मुलींची त्वचा ही पुरुषांच्या त्वचेपेक्षा जास्त संवेदनशील असते. संवेदनशीलता आणि कोरडी त्वचा यांसारख्या समस्यांमुळे मुलींच्या त्वचेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ज्यामुळे एसीची हवा त्रासदायक वाटू शकते.
कोरडी त्वचा : एसीमुळे मुलींची त्वचा लवकर कोरडी व्हायला सुरुवात होते आणि यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो. त्यामुळे त्यांना कोरड्या हवेचा परिणाम जास्त जाणवतो आणि त्वचेवर नकारात्मक परिणाम होतो.कोरड्या हवेमुळे त्वचा जळजळणे किंवा खाज सुटणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे त्वचेला एसीची हवा सहन न झाल्यासारखे वाटू शकते.
शरीरातील पाण्याचे प्रमाण : स्त्रियाच्या शरीरात पुरुषांपेक्षा पाण्याचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्या शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची प्रक्रिया वेगळी असू शकते. ज्यामुळे जास्त थंड वातावरण महिलांच्या शरीराला सहन होत नाही.
तर अशी काही कारणे आहेत ज्यामुळे मुलींना एसीची थंड हवा फार काळ सहन होत नाही. त्यामुळे तुमच्याही ऑफिसमध्ये अशी परिस्थिती असेल की मुली सारख्या एसी बंद करत असतील, तर यामागची ही कारणे लक्षात ठेवून ती समजून घ्या आणि अर्थातच त्यावर काहीतरी मध्य मार्ग काढणे योग्य.