Merry Christmas | ‘हॅपी ख्रिसमस’ नव्हे ‘मेरी ख्रिसमस’, जाणून घ्या या शुभेच्छांमागची रंजक कथा…

| Updated on: Dec 25, 2020 | 10:44 AM

आपण कुठल्याही सणाच्या शुभेच्छा देतो तेव्हा ‘Happy’ हा शब्द वापरतो. पण नाताळच्या शुभेच्छा देताना, ‘हॅपी ख्रिसमस’ न लिहिता, केवळ ‘मेरी ख्रिसमस’च का पाठवले जाते?

Merry Christmas | ‘हॅपी ख्रिसमस’ नव्हे ‘मेरी ख्रिसमस’, जाणून घ्या या शुभेच्छांमागची रंजक कथा...
Follow us on

मुंबई : आज संपूर्ण जग नाताळ अर्थात ख्रिसमस साजरा करत आहे. एकमेकांना भेटवस्तू देण्याबरोबरच लोक एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देखील देत असतात. तुम्हाला देखील तुमच्या मित्र-मैत्रिणींनी ‘मेरी ख्रिसमस’ असे मेसेज पाठवून शुभेच्छा दिल्या असतील, उत्तरादाखल तुम्हीदेखील ‘मेरी ख्रिसमस’ असा मेसेज पाठवला असेल. परंतु, आपण कधी असा विचार केला आहे का की, जेव्हा आपण कुठल्याही सणाच्या शुभेच्छा देतो तेव्हा ‘Happy’ हा शब्द वापरतो. पण नाताळच्या शुभेच्छा देताना, ‘हॅपी ख्रिसमस’ न लिहिता, केवळ ‘मेरी ख्रिसमस’च का पाठवले जाते?(Why do we greet someone with merry Christmas instead of happy Christmas)

दिवाळी किंवा होळीच्या दिवशी ‘मेरी दिवाळी’ किंवा ‘मेरी होळी’ असे का लिहिले जात नाही?, हा प्रश्नही जर तुमच्या मनातही निर्माण होत असेल तर, आज आम्ही तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर देणार आहोत…

मेरी आणि हॅपीमध्ये फरक काय?

जर, आपण मेरी आणि हॅपी यांच्यातील फरकांबद्दल बोललो तर दोन्ही शब्द आनंद व्यक्त करण्यासाठीच वापरतात. तथापि, बरेच तज्ज्ञ म्हणतात की, ‘मेरी’ या शब्दामध्ये थोड्याशा भावना देखील जोडल्या गेल्या आहेत. या शब्दांत आनंदाची अभिव्यक्ती देखील आहे.

तर,  हॅपी हा शब्द केवळ शुभेच्छा देण्यासाठी वापरला जातो. अशा वेळी लोक नाताळ सणाच्या शुभेच्छा देताना त्याला अधिक भावनात्मक करण्यासाठी ‘मेरी’ हा शब्द वापरला जातो. तसे, मेरी शब्द हा शब्दकोषात बर्‍याच वर्षांपासून आहे आणि याचा उल्लेख 16व्या शतकापासून केला जात आहे (Why do we greet someone with merry Christmas instead of happy Christmas).

मग हॅपी ख्रिसमस चुकीचे?

‘हॅपी ख्रिसमस’ असे म्हणणे देखील चुकीचे नाही. अगदी इंग्लंडचा राजा ‘किंग जॉर्ज पाचवा’ देखील ‘हॅपी’ या शब्दाचा वापर करत असे. ब्रिटनची राणी एलिझाबेथ यांनाही ‘मेरी’ या शब्दापेक्षा ‘हॅपी’ हा शब्द जास्त आवडत होता. असं म्हटलं जात होतं की, तिला ‘मेरी’ या शब्दावर काहीसा आक्षेप होता. त्याच वेळी, ब्रिटनमधील बर्‍याच उच्च-श्रेणीतील लोकांनी देखील ‘हॅपी’ या शब्दाचा वापर केला. परंतु, ‘मेरी ख्रिसमस’ या ट्रेंडमध्ये कायम आहे. बरेच लोक केवळ ‘मेरी ख्रिसमस’ म्हणतच शुभेच्छा देतात.

‘मेरी ख्रिसमस’ अशाच शुभेच्छा का?

प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनीही या शब्दाच्या प्रसारात मोलाचे योगदान दिले आहे. सुमारे 175 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या ‘अ ख्रिसमस कॅरोल’ या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी या शब्दाची ओळख करुन दिली. या पुस्तकात त्यांनी ‘मेरी ख्रिसमस’ आणि ‘हॅपी न्यू इयर’ या शब्दांचा उल्लेख केला होता. यानंतर, मेरी हा शब्द खूप प्रसिद्ध झाला आणि ख्रिसमससह जोडला गेला. जर, तुम्ही एखाद्याला ‘हॅपी ख्रिसमस’ म्हणत शुभेच्छा देत असाल आणि तुम्हाला उत्तरादाखल पुन्हा ‘हॅपी ख्रिसमस’ म्हटले जात असेल, तर त्यात काही वावगे नाही.

(Why do we greet someone with merry Christmas instead of happy Christmas)

हेही वाचा :