AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगभरातील मुली कोरियन मुलांवर फिदा, तरुणींना आकर्षित करणारे ओप्पा कल्चर नेमकं काय आहे?

Korean boyfriend Style : कोरियन मुलांमध्ये असे काय खास आहे की मुली त्यांच्यावर इतक्या फिदा होत आहेत? हा फक्त त्यांच्या लूकचा प्रभाव आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे? याची माहिती जाणून घेऊयात.

जगभरातील मुली कोरियन मुलांवर फिदा, तरुणींना आकर्षित करणारे ओप्पा कल्चर नेमकं काय आहे?
korean boyImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 09, 2026 | 6:29 PM
Share

जगभरातील मुलींमध्ये कोरियन मुलांची क्रेझ पहायला मिळते. तुम्ही सोशल मीडिया वापरत असाल किंवा नेटफ्लिक्स पाहत असाल तर तुम्ही ओप्पा हा शब्द अनेकदा ऐकला असेल. के ड्रामा आणि के पॉपच्या वाढत्या क्रेझमुळे जगभरातील मुलींमध्ये कोरियन मुलांबद्दल खास आकर्षण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, कोरियन मुलांमध्ये असे काय खास आहे की मुली त्यांच्यावर इतक्या फिदा होत आहेत? हा फक्त त्यांच्या लूकचा प्रभाव आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे? आज आपण यामागील ओप्पा कल्चरची माहिती जाणून घेऊयात.

काय आहे ओप्पा कल्चर?

कोरियन भाषेत ओप्पा या शब्दाचा अर्थ मोठा भाऊ असा होतो. मुली हा शब्द आपल्या सख्ख्या मोठ्या भावासाठी किंवा स्वतःपेक्षा मोठ्या मुलासाठी वापरतात. मात्र कालांतराने हा शब्द एक इमोशन बनला आहे. आता मुली आपल्या बॉयफ्रेंड किंवा क्रशला प्रेमाने आणि आदराने ओप्पा म्हणतात. ही फक्त एक हाक नसून अशा नात्याचे प्रतीक आहे जिथे मुलगा आपल्या पार्टनरची काळजी घेतो, तिचे संरक्षण करतो आणि तिला सन्मान देतो.

मुलींना कोरियन स्टाईल बॉयफ्रेंड का आवडतो?

जेंटलमनसारखा स्वभाव : जगातील अनेक ठिकाणी पुरुषत्व म्हणजे कठोर आणि रफ-टफ वागणे असे मानले जाते. मात्र कोरियन संस्कृतीने सॉफ्ट मॅस्क्युलिनिटीला प्रोत्साहन दिले आहे. ही मुले आपल्या भावना व्यक्त करण्यास घाबरत नाहीत. ते रडू शकतात, आपल्या पार्टनरबद्दल प्रेम दाखवू शकतात आणि खूप केअरिंग असतात. त्यामुळे मुलींना त्यांचा हा भावनिक स्वभाव खूप आवडतो.

स्किनकेअर आणि ग्रूमिंग : कोरियन मुले आपल्या ग्रूमिंगबाबत खूप जागरूक असतात. ग्लास स्किन, नीटनेटके केस आणि स्टायलिश कपडे यामुळे ते स्वतःला आकर्षक पद्धतीने प्रेझेंट करतात. मुलींना हे आवडते की त्यांचा पार्टनर स्वतःच्या स्वच्छतेची आणि व्यक्तिमत्त्वाची काळजी घेतो.

शिष्टाचार आणि आदर : कोरियन संस्कृतीत मोठ्यांचा आदर आणि शिष्टाचाराला खूप महत्त्व दिले जाते. ड्रामांमध्ये दाखवले जाणारे अम्ब्रेला सीन म्हणजे पावसात छत्री धरून देणे किंवा शूलेस बांधणे यासारख्या गोष्टी त्यांच्या संस्कृतीचा भाग आहेत. अशा छोट्या गोष्टी मुलींना खास असल्याची भावना देतात.

भावनिक आकर्षण : आपल्या पार्टनरचे बोलणे ऐकणे आणि तिच्या भावना समजून घेणे हे सर्वात मोठे आकर्षण आहे. हे ओप्पा कल्चरमध्ये दिसून येते.

छोट्या गोष्टींना महत्त्व : नात्यांमध्ये छोट्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या असतात. घरी पोहोचल्यानंतर मेसेज करणे किंवा तिच्या छोट्या गरजांची काळजी घेणे हे खुप महत्त्वाचे ठरते. या सर्व सवयींमुळे कोरियन मुले मुलींना आवडतात.

Follow Us
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा
Amit Shah | अमित शाह 19-20 सप्टेंबरला कोल्हापूर दौऱ्यावर! सलग दुसऱ्यांदा दौरा, राजकीय भेटीगाठींकडे लक्ष
मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती...
Manoj Jarange | मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा 19वा दिवस! पाणी-सलाईन बंद, प्रकृती चिंताजनक
महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण!
CM Fadnavis | महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट? फडणवीस सरकारची तयारी पूर्ण! मंत्रिमंडळात अर्धा तास सविस्तर चर्चा
मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद!
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद! फडणवीसांसमोर मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी...
Manoj Jarange | मला मुंबईत जाऊन मरू द्या! मनोज जरांगे पाटील भावुक; आरक्षणासाठी प्राणाची आहुती देण्याची तयारी
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना...
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! ग्राहकांना नाही तर दुकानदारांना भरावे लागणार शुल्क, व्हिडिओ बघाच
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था