Yoga Tips: घनदाट लांबसडक केसांसाठी रोज करा योगासने; ‘या’ योगासनांमुळे केस होतील काळे दाट आणि लांब!

| Updated on: Aug 24, 2022 | 5:37 PM

Yoga Tips:स्त्रिया असोत की पुरुष, केस हा त्यांच्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग असतो जो लुक अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवतो. मात्र, चुकीच्या जीवनशैलीमुळे केसांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. परंतु, काही योगासनांमुळे केसांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवीता येते.

Yoga Tips: घनदाट लांबसडक केसांसाठी रोज करा योगासने; ‘या’ योगासनांमुळे केस होतील काळे दाट आणि लांब!
Follow us on

स्त्रिया असोत की पुरुष, केस हा त्यांच्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग असतो जो लुक अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवतो. मात्र, हवामान, प्रदूषण, पौष्टिक आहाराचा अभाव (Lack of nutritious food) आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे केसांवर दुष्परिणाम (Effects on hair) होवुन समस्या उद्भवते. अनेकांचे केस झपाट्याने गळू लागतात. केस गळायला लागल्यास त्यांची वाढही थांबते. याशिवाय केस अकाली पांढरे होण्याची समस्या देखील असू शकते. पावसाळ्यात केस गळण्याची तक्रार जवळपास प्रत्येकाची असते. केस लांब, जाड आणि काळे ठेवण्यासाठी तसेच केसांची निगा राखण्यासाठी विविध प्रकारची उत्पादने वापरली जातात. मात्र, या उत्पादनांचे बहुतेक वेळेस साइड इफेक्ट्स होऊन केस गळण्याची समस्या (Hair loss problem) वाढू शकते. अशा परिस्थितीत केस दाट आणि लांब करायचे असतील तर नियमित योगासनांचा सराव फायदेशीर ठरू शकतो. जाणून घेऊया केसांच्या आरोग्यासाठी कोणती योगासने अधिक फायदेशीर ठरतील.

शीर्षासन

या आसनाने डोक्याच्या दिशेने रक्तप्रवाह चांगला होतो. शीर्षासनचा सराव केल्याने तणाव दूर होतो, तसेच केसांची वाढही चांगली होते. जर तुमचे केस गळत असतील आणि निर्जीव होत असतील किंवा तुमचे केस वेळेपूर्वी राखाडी होत असतील, तर शीर्षासनचा सराव करा. हे आसन करण्यासाठी दोन्ही हात डोक्याच्या मागे घ्या आणि खाली वाकताना डोके खाली ठेवा. आता शरीराचा समतोल राखून पाय वर करा. डोके वर उभे असताना, संतुलन ठेवा आणि सरळ करा.

बलासन

पोटाशी संबंधित समस्या आणि तणावापासून आराम मिळवण्यासाठी बलासनाचा सराव करू शकतो. पोटाच्या समस्या आणि तणावामुळे केस गळणे सुरू होते. त्यामुळे केसांची वाढ आणि घट्ट होण्यासाठी बालासन फायदेशीर ठरू शकते. हे आसन करण्यासाठी गुडघे वाकवून वज्रासनाच्या आसनांत बसा. आता हात वरच्या दिशेने हलवत दीर्घ श्वास घ्या. नंतर श्वास सोडताना शरीराला पुढे वाकवा. या अवस्थेत डोके जमिनीवर आणि पोट मांड्यांवर ठेवावे.

त्रिकोणासन

जर केस वेळेपूर्वी पांढरे होत असतील आणि केसांमध्ये कोरडेपणा येत असेल तर त्रिकोणासन करा. हे आसन करण्यासाठी दोन्ही पाय अंतरावर ठेवून उभे राहावे. आता हात आणि खांदे सरळ ठेवून त्यांना वर करा. उजवीकडे झुकत, उजव्या हाताने पायाला स्पर्श करा. या दरम्यान, डावा हात आकाशाकडे वर करा. दुसऱ्या बाजूला ही प्रक्रिया पुन्हा करा.

भुजंगासन

केसांना काळेभोर, जाड, आणि लांबसडक करण्यासाठी भुजंगासनाचा नियमित सराव करा. हे आसन करण्यासाठी पोटावर झोपा आणि पाय एकत्र करा. आता तळवे छातीजवळ खांद्याच्या रेषेवर ठेवून कपाळ जमिनीवर ठेवा. दीर्घ श्वास घेऊन शरीराचा पुढचा भाग वर घ्या. हात सरळ करताना काही सेकंद या आसनात राहा. नंतर श्वास सोडा आणि सामान्य स्थितीत परत या.