Yoga Tips: मॉर्निंग वॉक दरम्यान करा ‘ही’ योगासनं, शरीर राहील फिट

मॉर्निंग वॉक हा शरीर फिट आणि निरोगी ठेवण्याचा सोपा मार्ग आहे. मात्र, चालण्यासोबत काही योगासने केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास आणि स्नायूंना सक्रिय ठेवण्यास मदत होऊ शकते. वॉक करताना सहज करता येणारी ही ५ योगासने जाणून घ्या, ज्यामुळे तुमचा फिटनेस रुटीन अधिक प्रभावी होईल.

Yoga Tips: मॉर्निंग वॉक दरम्यान करा ही योगासनं, शरीर राहील फिट
| Edited By: | Updated on: Nov 29, 2026 | 2:55 PM

शरीर फिट आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमित चालणे आणि योगासने करणे हा एक उत्तम पर्याय आहे. दररोज सकाळी थोडा वेळ वॉक केल्याने शरीर सक्रिय राहते, तर योगासनांमुळे शरीराची लवचिकता वाढण्यास आणि स्नायूंना बळकटी मिळण्यास मदत होते. तुम्ही सकाळच्या वॉकदरम्यान काही सोपी योगासने करू शकता. यामुळे चालण्यासोबतच योगाचा सरावही होईल आणि कमी वेळेत दोन फिटनेस अॅक्टिव्हिटींचा लाभ घेता येईल. वॉक करताना सहज करता येणारी ही योगासने तुमच्या रोजच्या फिटनेस रुटीनमध्ये नक्कीच उपयोगी ठरू शकतात.

साईड बॉडी स्ट्रेच

Loading...

साईड बॉडी स्ट्रेच हा शरीराच्या बाजूचे स्नायू ताणण्यासाठी आणि त्यांना आराम देण्यासाठी उपयुक्त आहे. हे आसन करण्यासाठी पाय कंबरेच्या रुंदीइतके दूर ठेवून सरळ उभे राहा. दोन्ही हात डोक्याच्या वर घ्या. आता एका हाताने दुसरा हात पकडून शरीर हळूहळू विरुद्ध बाजूला ताणा. काही क्षण या स्थितीत राहा आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही हीच क्रिया करा.

गरुडासन

खांदे आणि पाठीचा वरचा भाग ताणण्यासाठी आणि ताण कमी करयासाठी, तुमचे हात ईगल पोझ मध्ये घ्या. नंतर उजवा हात डाव्या हाताखाली आणून, कोपर क्रॉस करा. तुमचे तळवे एकमेकांसमोर घडी करा. कोपर वर घ्या. असे केल्याने तुम्हाला तुमच्या पाठीच्या वरच्या भागात ताण जाणवेल. नंतर ५ खोल श्वास घ्या आणि साइड बदला.

उत्तानासन

हे आसन संपूर्ण पाठीला आराम देण्यासाठी आणि मन शांत करण्यासाठी उत्तम आहे. यासाठी, तुमचे पाय कंबरेपर्यंत वेगळे ठेवा आणि पुढे वाकायला सुरूवात करा. नंतर गुडघे वाकलेले आणि तुमचे पोट तुमच्या मांड्यांना स्पर्श करत पाठ सरळ ठेवा. तुमचे हात जमिनीवर ठेवा. नंतर पाठ आणखी सैल करण्यासाठी हळूहळू एका बाजूने दुसऱ्या बाजूला जा. हे करत असताना, काही खोल श्वास घ्या.

वृक्षासन

शरीराचा तोल आणि एकाग्रता सुधारण्यासाठी वृक्षासन करता येते. यासाठी सर्व वजन एका पायावर देऊन दुसरा पाय वर उचला. हा पाय नडगीच्या किंवा मांडीच्या आतील बाजूस ठेवा. आता दोन्ही तळवे छातीसमोर जोडून घ्या किंवा हात डोक्याच्या वर न्या. या स्थितीत संतुलन राखत खोल श्वास घ्या. त्यानंतर दुसऱ्या पायानेही हे आसन करा.

प्रसारित पादोत्तानासन

हे आसन करण्यासाठी समोर तोंड कन उभे रहा. नंतर तुमचे पाय कंबरेपेक्षा रुंद अंतराने सुरूवात करा. आता तुमचे हात तुमच्या कंबरेवर ठेवा आणि कंबरेपासून पुढे वाकायला सुरूवात करा. आता तुमचे हात जमिनीवर किंवा गुडघ्यांवर ठेवा. श्वास घेताना तुमचा पाठीचा कणा सरळ करा, श्वास सोडताना आणखी खोलवर जा. आता तुमचे हात तुमच्या पायांमध्ये घ्या आणि ५-१० श्वासांपर्यंत थांबा.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us