काँग्रेसने अखेरचा डाव टाकला, मोदी सरकारचं टेन्शन वाढलं; स्टॅलिन यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं?
काँग्रेसने अखेरचा डाव टाकला आहे. विरोधकांनी मोदी सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. स्टॅलिन यांच्यासोबतच्या बैठकीत काय ठरलं, जाणून घ्या

डिलिमिटेशन विधेयकावरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विरोधी पक्षाने बैठकांचा सपाटा लावला आहे. इंडिया आघाडील प्रमुख नेत्यांनी एम के स्टॅलिन आणि शरद पवार यांची मनधरणी करण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतून विमानाने विरोधकांनी चेन्नई गाठली. एका विमानात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री, अभिषेक बॅनर्जी, मीसा भारती, समाजवादी पक्षाचे दोन खासदार, कपिल सिब्बल होते. विरोधकांनी चेन्नई गाठल्यानंतर नेत्यांच्या बैठकीचा फोटो समोर आला आहे. या बैठकीत विरोधकांकडून एम के. स्टॅलिन यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
