AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmer ID: फार्मर आयडी नाही? मग काय करणार? शेतकर्‍यांनी अर्ज कुठे आणि कसा करावा?

Agristack Farmer ID: आता अनेक कृषी योजनाच नाही तर दुष्काळीसाठी आणि अवकाळी पावसामुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी फार्मर आयडी मागितला जात आहे. जर तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर अर्ज कुठे आणि कसा करावा?

Farmer ID: फार्मर आयडी नाही? मग काय करणार? शेतकर्‍यांनी अर्ज कुठे आणि कसा करावा?
फार्मर आयडी नाही? शेतकर्‍यांनी अर्ज कुठे आणि कसा करावा?
| Updated on: Nov 29, 2026 | 2:45 PM
Share

Agristack Farmer ID: शेती आणि शेतकर्‍यांशी संबंधित अनेक योजनांचा लाभ थेट मिळावा. त्यात पारदर्शकपणा राहावा यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राबवली जाते. या उपक्रमातंर्गत राज्यात 1.44 कोटी शेतकऱ्यांना स्वतंत्र डिजिटल ओळख क्रमांक अर्थात फार्मर आयडी तयार करण्यात आला आहे. तरीही अजून काही लाख शेतकऱ्यांचा फार्मर आयडी अद्याप तयार झालेला नाही. उर्वरित शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यास त्यांना दुष्काली अग्रिम मदत आणि इतर योजनांचे अनुदान तात्काळ मिळेल.

फार्मर आयडीचा फायदा

कृषी विषयक शासकीय योजनांसाठी गेल्या वर्षी 15 एप्रिल पासून फार्मर आयडी राज्य सरकारने बंधनकारक केले आहे. ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून शेतकरी आणि जमिनीशी आधारसंलग्न माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध होते. यामुळे वितरण प्रणालीत पारदर्शकता आली आहे. पीकविमा, नैसर्गिक आपत्तीमधील नुकसान भरपाई, कृषी पायाभूत सुविधा निधी तसेच शेती विकासासाठीच्या कर्ज योजनांमध्ये डिजिटल नोंदणीचा उपयोग होतो. यामुळे कागदी प्रक्रियेला मोठा फाटा मिळाला आहे.

कृषी खात्यानुसार, राज्यात 1.71 कोटी शेतकरी आहे. त्यापैकी 1.44 कोटींची नोंदणी पूर्ण झाली आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या 24 व्या हप्त्याच्या आकडेवारीनुसार 85.85 लाख लाभार्थ्यांपैकी 84.60 लाख शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक आयडी उपलब्ध आहे. त्यात आता सामायिक सातबारा असलेल्या शेतकऱ्यांचीही नोंदणी केली जात आहे. त्यात मालकीविषयी ज्वाईंट असा उल्लेख केला जाईल.

कसा मिळवाल फार्मर आयडी?

ज्या शेतकऱ्यांसाठी फार्मर आयडी अद्याप काढलेले नाही. त्यांनी जवळच्या सरकारी सेवा केंद्रात, CSC जाऊन नोंदणी करावी, अथवा ॲग्रीस्टॅकच्या अधिकृत पोर्टलवर mhfr.agristack.gov.in/farmer-registry येथे ऑनलाईन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.

नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी आधार कार्ड, आधारशी संलग्न मोबाईल क्रमांक, बँक खाते क्रमांक, सातबारा उताऱ्यावरील जमिनीचा तपशील, आधार ई-केवायसी आणि जमीन मालिकीची पडताळणी करणे आवश्यक आहे. तुमच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यावर फार्मर आयडी देण्यात येतो. याविषयीची काही अडचण असेल तर तुम्हाला कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधता येईल. अडचण असेल अथवा कागदपत्रात त्रुटी असले तर पडताळणीत ती बाब समोर येईल. त्रुटी दूर झाल्यावर फार्मर आयडी मिळेल.

Follow Us
मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटल यांना...
Raksha Khadse : मतचोरीच्या आरोपांवर रक्षा खडसे आक्रमक; चंद्रकांत पाटलांना दिलं प्रत्युत्तर!
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; मोदी
एकनाथ शिंदेंचा डीलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकाला ठाम पाठिंबा; म्हणाले, मोदींचे निर्णय ऐतिहासिक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाबाबत फडणवीसांचा मोठा निर्णय; कामासाठी दिले स्पष्ट निर्देश!
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बन...
2019 सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, काँग्रेसची लाचारी केली! नवनाथ बनांचा उद्धव ठाकरेंना थेट सवाल
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधा
तर शरद पवार साहेबांची जाहीर माफी मागेन; विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान! नेमकं काय म्हणाले?
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश...
बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या तर राज ठाकरे मुख्यमंत्री होतील; अविनाश जाधव यांच्या विधानाची सर्वत्र चर्चा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
पैशातून सत्ता अन् सत्तेतून पैसा! राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा, थेट म्हणाले...
विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' राऊतांचा
Sanjay Raut : 'विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटण्याची सुळेंना भीती' संजय राऊतांचा दावा
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक...
मेळघाटात अदानींच्या जलविद्युत प्रकल्पाला विरोधाची धग वाढली; युवक काँग्रेसचा आंदोलनाचा इशारा!
शरद पवारांच्या NCP ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे...
शरद पवारांच्या NCP  ने डिलिमिटेशन विधेयकाच्या विरोधात मतदान करावे; काँग्रेस नेत्याचे पुन्हा आवाहन!