Nanded Lok sabha election result : नांदेड लोकसभा मतदारसंघ

| Updated on: Jul 05, 2019 | 3:38 PM

नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात मानहानीकारक पराभव झाला आहे. ते स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने नांदेड लोकसभेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला नांदेड लोकसभेसाठी मतदान झालं होतं. 2014 च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला होता. 2014 साली नांदेडमध्ये 61 टक्के मतदान झालं होतं. यावेळी […]

Nanded Lok sabha election result : नांदेड लोकसभा मतदारसंघ
नांदेड : प्रतापराव-पाटील चिखलीकर
Follow us on

नांदेड : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांचा नांदेड लोकसभा मतदारसंघात मानहानीकारक पराभव झाला आहे. ते स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने नांदेड लोकसभेकडे राज्याचं लक्ष लागलं होतं. लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला नांदेड लोकसभेसाठी मतदान झालं होतं. 2014 च्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का वाढला होता. 2014 साली नांदेडमध्ये 61 टक्के मतदान झालं होतं. यावेळी 65 टक्के मतदान झालं आहे. नवमतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्याने टक्केवारी वाढली आहे.

पक्षउमेदवारनिकाल
भाजप/शिवसेनाप्रताप पाटील चिखलीकर (भाजप)विजयी
काँग्रेस/ राष्ट्रवादीअशोक चव्हाण (काँग्रेस)पराभूत
अपक्ष/इतर प्रा. यशपाल भिंगे (VBA)पराभूत

रंगतदार निवडणूक, मुख्यंमत्र्यांचं विशेष लक्ष

अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपने आमदार प्रताप पाटील यांना मैदानात उतरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इथे विशेष लक्ष दिल्याने नांदेडची निवडणूक रंगतदार झाली. बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांचाही प्रचार लक्षवेधी होता. त्यामुळे नांदेडच्या निवडणुकीत रंगत आली.

नांदेडमध्ये कुणा-कुणाच्या सभा झाल्या?

नांदेडमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, माजी उमुख्यमंत्री छगन भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर, एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी, सपा नेते अबू आझमी, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद इत्यादी नेत्यांच्या प्रचारसभा नांदेडमध्ये झाल्या. या प्रचारसभामुळे नांदेडचं वातावरण ढवळून निघालं होतं.

कोणते मुद्दे केंद्रस्थानी आणि समीकरणं काय?

नांदेडच्या लोकसभा निवडणुकीत स्थानिक पातळीवर रोजगाराचा अभाव हा मुद्दा चांगलाच गाजला. नांदेड हा काँग्रेसचा गड मानला जातो. त्यामुळे इथे काँग्रेसला काहीच अडचण नाही हा समज यावेळेला मात्र खोटा ठरला. भाजप आणि वंचितच्या उमेदवारामुळे काँग्रेसला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. असं असलं तरी मतदानाच्या अगदी दोन दिवसाआधी भाजपचे काही नेते फितूर झाले होते. त्याच बरोबर पोस्टल मतदानाकडेही काँग्रेसने विशेष लक्ष पुरवले आणि ते आपल्या पदरात पाडून घेतले. त्यामुळे काँग्रेस समर्थक आपला विजय निश्चित असल्याचं मानत आहेत. मात्र असं असलं तरी वंचित बहुजन आघाडी किती मतदान घेते, यावर सारी गणित अवलंबून आहेत.

विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान

  • भोकर – 70.71 टक्के
  • नांदेड उत्तर – 62.73 टक्के
  • नांदेड दक्षिण – 64.17 टक्के
  • नायगाव खै. – 69.79 टक्के
  • देगलूर – 63.31 टक्के
  • मुखेड – 60.48 टक्के

नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 17 हजार 830 मतदार होते. यात पुरुष मतदारसंख्या 8 लाख 91 हजार 105, तर 8 लाख 26 हजार 662 महिला मतदार, तर 63 इतर मतदार होते. यापैकी 11 लाख 19 हजार 116 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.