नागपूरमध्ये सौम्य भूकंप, 2.6 रिश्टर स्केल तीव्रतेची नोंद
मोठी बातमी समोर येत आहे, नागपूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार, आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी हा भूकंप झाला आहे. 2.6 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप होता.

मोठी बातमी समोर येत आहे, नागपूर जिल्ह्यात सौम्य भूकंपाची नोंद झाली आहे. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार, आज दुपारी 2 वाजून 17 मिनिटांनी हा भूकंप झाला आहे. 2.6 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंप होता. सुदैवाने या भूकंपामध्ये कोणतीही जीवीतहानी अथवा वित्तहानी झाल्याची नोंद नाही. या भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किलोमीटर होती. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने या भूकंपाची नोंद रिव्ह्यूड म्हणजेच तपासून निश्चित केलेली असल्याचं नमूद केलं आहे. या भूकंपाचे धक्के नेमक्या कोणत्या भागात जाणवले आणि नागरिकांना त्याची जाणीव झाली का? हे कळू शकलेलं नाही.
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या अधिकृत नोंदीनुसार आज दुपारी दोन वाजेच्या आसपास या भूकंपाची नोंद झाली आहे. हा सौम्य भूकंप होता. या भूकंपाची खोली जमिनीखाली 5 किलोमीटर होती. या भूकंपाचे धक्के नेमक्या कोणत्या भागात जाणवले आणि नागरिकांना त्याची जाणीव झाली का? यांची माहिती मात्र अद्याप समोर आलेली नाहीये.