AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Jalna Politics: एकनाथ शिंदेंना धक्का! दौऱ्याआधीच पक्षाला खिंडार, तालुकाध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

जालन्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रित्या राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सर्व पदाधिकार्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

Jalna Politics: एकनाथ शिंदेंना धक्का! दौऱ्याआधीच पक्षाला खिंडार, तालुकाध्यक्षासह सर्व पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
| Updated on: Nov 08, 2026 | 5:23 PM
Share

रामनाथ ढाकणे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी:

Jalna Politics News:  राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यामध्ये ते शेतकरी बांधवांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करणार आहेत. एकीकडे एकनाथ शिंदेंच्या या दौऱ्याची जय्यत तयारी सुरु असतानाच जालन्यामध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. जालन्यातील मंठा परतूर विधानसभा मतदार संघात  तालुका प्रमुखांसह शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामुहिक राजीनामे दिले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या दौऱ्याआधी मोठा धक्का!

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधीच जालना जिल्ह्यात शिवसेनेला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळत आहे. जालन्यातील मंठा परतूर विधानसभा मतदारसंघातील तालुका प्रमुखांसह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रित्या राजीनामा दिला आहे. जिल्हाप्रमुख आसाराम बोराडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन सर्व पदाधिकार्यांनी शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

जालन्यात पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे! 

2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आसाराम बोराडे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर ते पक्षाचे जिल्हाप्रमुख झाले. मात्र आसाराम बोराडे हे पदाधिकाऱ्यांना डावलत पक्षाचे सर्व कार्यक्रम करत आहेत, असा आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यामुळेच  जिल्हाप्रमुखांच्या कार्यपद्धतीवर नाराज होऊन तालुकाप्रमुखासह सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक रित्या राजीनामा देत शिवसेना पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जालना दौऱ्यावर! 

राज्यात दुष्काळाच्या तीव्र झळा पाहायला मिळत असून शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य नागरिक अडचणींचा सामना करत आहेत. राज्यातील नागरिक संकटात असताना त्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी 9 नोव्हेंबर रोजी जालना जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. जालन्यातील मौजपुरी येथे श्री. रामेश्वरी महादेव संस्थान याठिकाणी उपमुख्यमंत्री शिंदे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची संवाद साधणार आहेत त्यांच्या व्यथा ऐकून घेणार आहेत.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्याच्या नरखेड तालुक्यातील लोहारी सावंगा या गावामध्ये मुक्काम ठोकला. यावेळी त्यांनी शेतकरी बांधवांसोबत दिवाळी साजरी केले स्नेहभोजनही केले. त्याचप्रमाणे आता उपमुख्यमंत्री शिंदेही शेतकऱ्यांच्या सुख दुःखात सहभागी होणार आहेत.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा