रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं; भंडाऱ्यात एसटी महामंडळाचा धक्कदायक प्रकार

Bhandara News: रात्रीच्या मिट्ट अंधारात भंडाऱ्यातील रोहा गावातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. एसटीने प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात रस्त्यातमधेच उतरवलं. नेमकं प्रकरण जाणून घ्या.

रात्रीच्या अंधारात दोन विद्यार्थिनींना रस्त्यातचं उतरवलं; भंडाऱ्यात एसटी महामंडळाचा धक्कदायक प्रकार
Bhandara News
| Updated on: Nov 15, 2026 | 12:15 PM

गावावमध्ये महत्त्वाचं आणि अनेकांच्या प्रवासाचं मुख्य साधन हे लालपरी अर्थात एसटी आहे. ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ आणि ‘सुरक्षित प्रवास’ असं ब्रीदवाक्य असलेल्या या महामंडळाने मात्र याच्याच एकदम उलट काम केलं आहे. भंडाऱ्यातील रोह्यात एक एसटी बसशी संबंधित एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. भंडारा ते मुंढरी असा प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनींना एसटी बसमधून अर्ध्या वाटेतचं अंधारात बसमधून उतरवल्याचा प्रकार घडला आहे. चालक आणि वाहक अशा दोघांनी मिळून रात्रीच्या अंधारात वाटेतचं रोहा गावात उतरवून दिल्याची घटना घडली. घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. याशिवाय मुलींच्या पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं काय घडलं?

भंडारा येथून निघून मुंढरी या गावाकडे जाणारी बस (एम.एच. 40 वाय 5008) रात्रीच्या वेळी रोहा गावात पोहोचली. इथे पोहचेपर्यंत फक्त दोन मुलीच प्रवाशी उरल्या होत्या. बाकीचे प्रवासी आधीच उतरले होते. पण रोहा गावातून पुढे मुंढरीला या दोन्ही विद्यार्थिनी जायचं होतं. पण अजून कोणतेही प्रवास बसमध्ये नसल्याचे कारण देऊन चला आणि वाहकानं या दोन्ही विद्यार्थिनींना रात्रीच्या मिट्ट अंधारात रोहा गावातच खाली उतरवलं. या घडलेल्या प्रकार सगळ्यांचं समजला. या प्रकरणाची माहिती समजताच जिल्हा परिषदचे शिक्षण आणि बांधकाम सभापती नरेश ईश्वरकर हे आपला नियोजित दौरा तात्काळ रद्द करून थेट रोहा गावात पोहचले.

Loading...

नरेश ईश्वरकर यांनी काय केलं?

रोहा येथे घटनास्थळी पोहचल्यावर नरेश ईश्वरकर यांनी चालक आणि वाहकाची चांगलीच शाळा घेतली. पुढे त्यांनी थेट एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मोबाईलवरून घडलेला प्रकार सांगून या दोघांची तक्रार करत कठोर कारवाईची मागणी केली. नरेश ईश्वरकर यांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच सगळीकडे संताप

घडलेली घटना लगेचच परिसरात पसरली. यामुळे पालकांमध्ये खळबळ उडाली. विद्यार्थिनी एसटी प्रशासनावर विश्वास ठेवून प्रवास करत असताना अशाप्रकारे त्यांना त्यांच्या नियोजित गावापर्यंत सुरक्षित न पोहचवल्याने सगळीकडेच संताप पाहायला मिळाला. केवळ बसमध्ये इतर प्रवासी नसल्याचं कारण देणे न पटणारे आहे. रात्रीच्या अंधारात निर्जन ठिकाणी दोन मुलींना सोडून देण्याचा निर्णय घेताना दोघांनीही कसा घेतला असा सवाल केला जात आहे. चालक आणि वाहकाने त्यांच्या सुरक्षिततेचा साधा विचारही केला नाही का? असे पालक विचारत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us