ठाकरे गटाचे आमदार फुटणार? शिंदे गट पुन्हा डाव टाकणार? ‘ऑपरेशन टायगर 3’वर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
उदय सामंत यांनी पुन्हा ऑपरेशन टायगर करणार असल्याचे संकेत दिले आहेत. या 'ऑपरेशन टायगर 3'वर आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाष्य केले.

राज्यात फोडाफोडीचं राजकारण सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. शिंदे गटाची पुन्हा ठाकरे गटाचे आमदार-खासदारांवर नजर असल्याचे समोर येत आहे. शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांनी पुन्हा एकदा ‘ऑपरेशन टायगर’ करणार असल्याचे जाहीर केले. परंतु त्यांनी ‘ऑपरेशन टायगर’ची वेळ आणि तारीख सांगितली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकद उद्धव ठाकरेंना झटका देण्याच्या तयारीत आहे. या ‘ऑपरेशन टायगर’वर आमदार आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ऑपरेशन टायगरआधी महाराष्ट्राचे हाल बघा, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.
ऑपरेशन टायगरवरून आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. आदित्य ठाकरे म्हणाले, ‘जे तिकडे गेले, महाराष्ट्राची ज्यांनी गद्दारी केलीये. त्याचं एकच कारण असून पैसा आणि सत्ता भाजप आणि गळचेपी केल्यानंतर, त्यांना कुठेतरी वाटतंय की, आपण नाव गमवतोय. आता ते मार्ग शोधायचा प्रयत्न करतायेत. उद्धव साहेबांपर्यंत येण्याचा प्रयत्न करताहेत. मला राजकारणात जायचं नसून पण या लोकांनी एका घाणेरड्या स्तरापर्यंत राजकारण नेलंय. यांनी महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवलाय. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या घरावर दगडफेक होते. विद्यार्थी रस्त्यावर उतरत आहेत. दुष्काळामुळे शेतकरी त्रस्त आहे. राज्यात पाण्याचा प्रश्न निर्माण झालाय. मराठवड्यात पंधरा दिवसांत पाणी येतंय. ती परिस्थिती मुंबईही होणार आहे. प्रदूषण वाढतंय. ‘गोकुळ’बद्दल बोललोच आहे, मत चोरी अजून काय… जगातील मोठा पक्ष आणि त्याला वाटतं की, मागून यावं आणि पुढे जावं, असं वाटतं. आता मला वाटतं की, उद्या ते एक नवीन कायदा आणताय, शाळेच्या वर्गातील जे क्लास मॉनिटर आहेत, ते पण असेच वरतून येतील’.
‘ऑपरेशन टायगर’वर आदित्य ठाकरे म्हणाले, अरे बाबांनो सगळं करा, ऑपरेशन टायगर करा. पण महाराष्ट्राची ते हाल करून ठेवलेत, जे उद्योगधंदे तिथून जात आहेत. नाशिकचे रस्ते बघा. याच्यावर कोण काय बोलतोय, काय बघा. फक्त राजकारण राजकारण सुरू आहे. भाजपशासित ज्या महानगरपालिका आहेत. प्रत्येक खासगीकरणीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे. हॉस्पिटल खासगी करतील. एक दिवस सर्वकाही अदानी यांच्या नावावर करतील’.
ऑपरेशन टायगरवर संजय राऊत काय म्हणाले?
संजय राऊत म्हणाले, ‘दोन्ही पक्ष अमित शाहांचे असून त्यांना कोणतीही भूमिका नाही. शिंदे गटाला स्वाभिमान गुंडाळून काम करावं लागत आहे. त्यांना विचारधारा नाही, सत्तेच्या फेविकॉलमुळे ते तिथे आहेत. उदय सामंत उद्या कुठे असतील, त्यांना विचारा. ऑपरेशन टायगर सांगितलं म्हणजे त्यांनी आम्हाला टायगर असल्याचे मान्य केलं. आम्ही माकडं नाही, इथे तिथे उड्या मारणारे.. आता अमित शाहांच्या दोन पक्षांनी त्यांचा पक्ष सांभाळावा, मैदान इथेच आहे’.
