72 वर्षांचे आजोबा जेव्हा बुद्धिबळ खेळतात, भलेभलेही गार! आजोबांनी स्पर्धेचा आखाडा गाजवला

| Updated on: Feb 22, 2021 | 9:47 PM

शिवजयंती निमित्ताने लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नागपूरच्या ईश्वर रामटेके सहभागी झाले (72 year old man win chess tournament in Jalgaon).

72 वर्षांचे आजोबा जेव्हा बुद्धिबळ खेळतात, भलेभलेही गार! आजोबांनी स्पर्धेचा आखाडा गाजवला
Follow us on

जळगाव : शिवजयंती निमित्ताने लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत नागपूरच्या ईश्वर रामटेके सहभागी झाले. या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेची छाप सोडत स्पर्धेचा आखाडा गाजवला. ईश्वर रामटेके यांच्या अंगी असलेली जिद्द तरुणांना प्रेरणादायी आहे (72 year old man win chess tournament in Jalgaon).

शिवजयंती निमित्ताने लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने जळगावात खुल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या स्पर्धेत जळगाव जिल्ह्यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत एका स्पर्धकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ते म्हणजे 72 वर्षीय ईश्वर रामटेके या आजोबांनी. वयाच्या उत्तरार्धाच्या टप्प्यातही रामटेके आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर बुद्धिबळाचा पट म्हणजेच आखाडा गाजवत आहेत.

रामटेके आजोबांनी यापूर्वी देखील देशभरात अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. वयाच्या सत्तरीनंतरही रामटेके यांनी बुद्धिबळ खेळण्याची आवड जोपासली आहे. म्हणूनच ते बुद्धिबळाच्या स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभागी होत असतात (72 year old man win chess tournament in Jalgaon).

अशी लागली बुद्धिबळ खेळाची गोडी

ईश्वर रामटेके हे नागपूर शहरातील इंदुरा भागातील रहिवासी आहेत. ते वयाच्या पंधराव्या वर्षापासून बुद्धिबळ खेळत आहेत. ते लहान असताना इंदुरा भागात काही तरुण बुद्धिबळ खेळत असत. त्यांची गंमत पाहत असताना रामटेके हेदेखील बुद्धिबळ खेळायला लागले. बुद्धिबळ खेळताना आपल्या बुद्धीचा कस लागत असल्याने त्यांना बुद्धिबळ खेळाची गोडी लागली.

गल्लीत बुद्धिबळ खेळत असताना पुढे ते स्थानिक पातळीवर आयोजित होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. त्यात यश मिळत गेल्याने ते जिल्ह्याबाहेर आयोजित होणाऱ्या बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभागी होऊ लागले. अशा पद्धतीने बुद्धिबळ खेळाविषयीची त्यांची आवड वाढत गेली.

दरम्यान, बुद्धिबळ खेळणाऱ्या तरुणांना ईश्वर रामटेके यांनी एक महत्त्वपूर्ण संदेश दिला आहे. “बुद्धिबळ खेळ खेळताना आपल्या बुद्धीचा कस लागतो. समोरची व्यक्ती आपल्यावर कशा पद्धतीने चाल करत आहे, याचा अंदाज घेत असताना त्याची चाल कशी परतावून लावायची, त्याला नामोहरम कसे करायचे, यासाठी आपल्याला बुद्धी चालावी लागते”, असे रामटेके म्हणाले.

हेही वाचा : PHOTO | गबरु, केक आणि बरंच काही, पुजा चव्हाण-संजय राठोडांच्या नव्या फोटोंची पुन्हा चर्चा