Devendra Fadnavis : चार लोक येतात आणि…मुख्यमंत्री फडणवीसांच भाषण सुरु असताना घोषणाबाजी, गोंधळ VIDEO

Devendra Fadnavis :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना काही जणांना घोषणाबाजी केली. पोलिसांनी घोषणाबाजी करुन गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

Devendra Fadnavis : चार लोक येतात आणि...मुख्यमंत्री फडणवीसांच भाषण सुरु असताना घोषणाबाजी, गोंधळ VIDEO
Devendra Fadnavis
| Updated on: Sep 17, 2025 | 9:58 AM

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आजच्या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाषण सुरु असताना काही जणांना घोषणाबाजी केली. पोलिसांनी घोषणाबाजी करुन गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. हैदराबाद गॅझेट रद्द करावं, ओबीसींवर अन्याय होत असल्याची घोषणबाजी काही जणांनी केली. “मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा कार्यक्रम सुरु असताना काही लोक येऊन नारेबाजी करतात. यापेक्षा स्वातंत्र्यसंग्राम सेनानींचा अपमान असू शकत नाही. ईश्वर त्यांना सुबुद्धी देवो. चार लोक येतात, अशा प्रकारे नारेबाजी करुन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतात हे योग्य नाही. मी त्या बद्दल काही बोलणार नाही” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज 78 वा मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे.

 

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्याहस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला. पंकजा मुंडे यांच्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हुतात्म्यांना अभिवादन. आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्यासाह अधिकारी उपस्थित होते. जालना शहरातल्या टाउन हॉल परिसरातील विजय स्तंभच्या ठिकाणी पार पडला कार्यक्रम. पोलिसांकडून हवेत 3 फैरी झाडून करण्यात आलं अभिवादन.

अजितदादांच्या ताफ्यासमोर अचानक दोन तरुण आले, आणि….

आज मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त अजित दादा बीडमध्ये आहेत. दादांचा ताफा ध्वजारोहणासाठी पोलीस ग्राउंडकडे जात होता‌. यादरम्यान दोन तरुणांनी अचानक ताफ्याच्या समोर येत अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.सदर तरूण केज तालुक्यातील कुंभेफळ येथील आहेत. यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ ताब्यात घेतलं यावेळी तरुणांनी न्याय द्या, न्याय द्या अजित दादा न्याय द्या अशा घोषणा दिल्या.

मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

“मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो. मराठवाड्याला मुक्ती मिळाली मराठ्यांना मुक्ती मिळाली पाहिजे.
आज जे कुणबी प्रमाणपत्र वाटप होणार आहे, त्यांनी अंतरवाली सराटीला यायचं. मला ते पाहू द्या.
जीआरच्या आधारे प्रमाणपत्र दिली की नाही ते कळणार. पावसामुळे मोठं नुकसान झालं. जनावरे वाहून गेली सरकारने सरसकट मदत करावी. जनावरे वाहून गेली मात्र अधिकारी विचारतात पंचनामा करायचा जनावरे कुठे आहेत?. दसरा मेळावा होणार अजून तयारी नाही मात्र मराठ्यांनी वर्षातून एकजूट दाखवावी” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.