Video: तुळजाभवानीच्या मंदिरात बिबट्या शिरला आणि प्रसाद घेऊन पळाला, पाहा सिंधुदुर्गातल्या शिकारीचा CCTV व्हिडीओ!

| Updated on: Sep 23, 2022 | 4:58 PM

मंदिर परिसरात निरव शांतता असते. मात्र, असं असलं तरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर या मंदिरावर असते. याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गुरुवारी रात्री एक प्रकार कैद झाला.

Video: तुळजाभवानीच्या मंदिरात बिबट्या शिरला आणि प्रसाद घेऊन पळाला, पाहा सिंधुदुर्गातल्या शिकारीचा CCTV व्हिडीओ!
सिंधुदुर्गच्या तुळजाभवानी मंदिरात बिबट्या शिरला
Follow us on

सिंधुदुर्ग: महाराष्ट्रात बिबट्यांची ( Leopard ) कमी नाही. कधी ऊसात, कधी ऱस्त्यावर, कधी गावात बिबट्या शिरल्याच्या बातम्या येत राहतात. शिकार न मिळाल्याने बिबट्या आपला मूळ अधिवास सोडतो, आणि शिकारीच्या शोधात मानवी वस्तीत येतो. असाच एक व्हिडीओ आता व्हायरल (Viral Video) होत आहे, ज्यामध्ये बिबट्या चक्क तुळजाभवानीच्या मंदिरात (Tulja Bhavani Temple) शिरला आहे. सिंधुदुर्गातील (Sindhudurga) ही घटना आहे. विशेष, म्हणजे बिबट्याचा हा सगळा वावर सीसीटीव्ही कॅमऱ्यात कैद झाला आहे.

घटना आहे सिंधुदुर्गातली. इथल्या आरोंदा-गाविळवाडी गावात एक तुळजाभवानीचं जुनं मंदिर आहे. आजूबाजूला दाट झाडीने घेरलेलं. रात्र झाली, की पुजारी मंदिर लावतात, आणि घरी जातात. मंदिर परिसरात निरव शांतता असते. मात्र, असं असलं तरी, सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर या मंदिरावर असते. याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात गुरुवारी रात्री एक प्रकार कैद झाला.

त्याचं झालं असं, नेहमीप्रमाणे मंदिर बंद करुन पुजारी घरी गेले. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास या मंदिरात एक शिकार येऊन लपला. बिबट्यापासून वाचण्यासाठी कदाचित ही सुरक्षित जागा आहे, असं त्याला वाटलं असेल. पण बिबट्याला त्याची भनक आधीच लागली होती. घात लावून बसलेला बिबट्या थेट पळत आत शिरला, गाभाऱ्याच्या दिशेने आला. तितक्यात कॅमेऱ्यात टेबलच्या मागे काहीतरी पळताना दिसतं. बिबट्याने त्या दिशेने धाव घेतली. आधी टेबलावरुन हे शिकार पकडण्याचा प्रयत्न केला.

हे सुद्धा वाचा

हा प्रयत्न फसल्यावर बिबट्या टेबलाच्या दुसऱ्या दिशेने गेला, आणि ते शिकार पकडलंच. सीसीटीव्ही फुटेजवरुन हे कदाचित मांजर वा कुत्र असल्याचं जाणवतं. पण बिबट्याने कुणाची शिकार केली हे खात्रीने सांगता येत नाही.

व्हिडीओ पाहा:

सकाळी पुजारी आल्यानंतर त्याला मंदिरातील सगळं सामान विखुरलेलं दिसलं. त्यामुळं मंदिरात चोरी झाल्याचा समज झाला. सीसीटीव्ही फुटेज जेव्हा तपासलं, तेव्हा हा वेगळाच प्रकार असल्याचं लक्षात आलं. आतापर्यंत या परिसरात बिबट्या नाही असाच समज स्थानिकांचा होता. मात्र बिबट्याच्या या सीसीटीव्ही फुटेजनंतर आता गावात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावी अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे.