खेळता खेळता नाल्यात पडला चिमुरडा, मात्र दैव बलवत्तर होते म्हणून…

रात्रभर मुसळधार झाल्याने पावसामुळे सांगलीच्या कुपवाड रोडवरील चैत्रबेन नाला ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. या नाल्याशेजारी गजानन कॉलनी राहणारा 3 वर्षीय चिमुरडा खेळत असताना नाल्यात पडला.

खेळता खेळता नाल्यात पडला चिमुरडा, मात्र दैव बलवत्तर होते म्हणून...
खेळता खेळता नाल्यात पडला चिमुरडा
Image Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Oct 22, 2022 | 3:20 PM

सांगली : सांगलीत मुसळधार पावसामुळे ओव्हर फुल झालेल्या नैसर्गिक नाल्यात वाहून गेलेल्या (Swept away in the stream) 3 वर्षीय मुलगा वाहून गेला. मात्र दैव बलवत्तर म्हणून एका धाडसी युवकाने त्याचे प्राण वाचवले (Child Rescued by Youth) आहे. राहुल कांबळे असे या धाडसी युवकाचे नाव आहे. जीवाची बाजी लावत राहुलने नाल्यात उडी मारत पोहत जात वाहत जाणाऱ्या 3 वर्षीय मुलाचे प्राण वाचवले. जुना कुपवाड रोडवरील (Kupwad Road Sangali) गजानन कॉलनीत ही घटना घडली आहे. जीव वाचणाऱ्या तरुणाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पावसामुळे नाला ओव्हरफ्लो

रात्रभर मुसळधार झाल्याने पावसामुळे सांगलीच्या कुपवाड रोडवरील चैत्रबेन नाला ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. या नाल्याशेजारी गजानन कॉलनी राहणारा 3 वर्षीय चिमुरडा खेळत असताना नाल्यात पडला.

पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने चिमुरडा वाहत गेला

नाल्यात पाण्याचा प्रवास जास्त असल्याने तो चिमुरडा नाल्यातून वाहू लागला. त्याच्या आईने आरडा ओरडा करताच त्या ठिकाणी असलेल्या राहुल कांबळे या युवकाने थेट नाल्यात उडी घेतली. तोपर्यंत हा चिमुरडा 500 फुटापर्यंत वाहून गेला होता.

तरुणाच्या धडासीपणाचे सर्वत्र कौतुक

कांबळे याने धाडसाने पोहत जात चिखल राडीतून त्या चिमुरड्याला पकडले आणि नाल्यातून बाहेर काढले. या प्रकारानंतर स्थानिक नागरिक गोळा झाले. एका 3 वर्षीय चिमुरड्याला वाचवण्यासाठी राहुल कांबळे या तरुणाने दाखवलेले धाडस आणि हजर जबाबीपणाचे स्थानिक नागरिकांनी कौतुक केले आहे.