AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महायुतीत महाभूकंप, भाजपाला सर्वात मोठा धक्का, शिवसेनेच्या बड्या नेत्याची थेट बंडखोरी? मुलाला… टेन्शन वाढलं!

समीर सत्तार या जागेसाठी अगोदरपासूनच आग्रही होते. भाजपाने या ठिकाणी सुहास शिरसाट यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे समीर सत्तार यांनी आपल्याच मित्रपक्षातील उमेदवाराला एका प्रकारे आव्हान निर्माण केले आहे, त्यामुळे काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

महायुतीत महाभूकंप, भाजपाला सर्वात मोठा धक्का, शिवसेनेच्या बड्या नेत्याची थेट बंडखोरी? मुलाला... टेन्शन वाढलं!
devendra fadnavis and eknath shindeImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 01, 2026 | 2:53 PM
Share

Chhatrapati Sambhajinagar Jalna Vidhan Parishad Election : सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसाठीच्या विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळू निघाले आहे. आपल्या पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने अनेक नेत्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. तर काही पक्षांमध्ये निष्ठावंतांना डावलून आयारामांना तिकीट मिळाल्यामुळे मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे. काही ठिकाणी तर पक्षादेश झुगारून अनेक नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दरम्यान आता छत्रपती संभाजीनगर-जालना मदरारसंघात महायुतीत मोठी बंडखोरी पाहायला मिळत आहे. ही जागा भाजपाला सुटलेली असताना शिवसेना पक्षातील एका बड्या नेत्याच्या मुलाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघात महायुतीची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपाला सुटलेली आहे. ही जागा आम्हाला मिळावी, अशी शिंदे यांच्या शिवसेनेची मागणी होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगलाच जोर लावला होता. परंतु ही जागा भाजपाच्या वाट्याला गेली आहे. त्यामुळे संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. एकीकडे आम्ही महायुतीत एकदिलाने लढू असे सांगितले जात आहे. परंतु शिवसेना पक्षाचे आमदार तथा माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता सत्तार आणि सत्तार यांच्या मुलाने बंडखोरी केली का? असे विचारले जात आहे.

ठाकरे गटाकडून डोणगावकर यांना तिकीट

समीर सत्तार या जागेसाठी अगोदरपासूनच आग्रही होते. भाजपाने या ठिकाणी सुहास शिरसाट यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे समीर सत्तार यांनी आपल्याच मित्रपक्षातील उमेदवाराला एका प्रकारे आव्हान निर्माण केले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत ही जागा ठाकरे यांच्या शिवसेनेला मिळाली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेने येथे संभाजीनगरच्या माजी जिल्हापरिषद अध्यक्षा देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरात नेमकं काय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन
हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
Vidyanand Bapat | भावना म्हणजे हात-पाय दुखण्यासारख्या नाहीत! हल्ल्यानंतर विद्यानंद बापट आक्रमक; DJ बंदीच्या मागणीवर म्हणाले...
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! 8 दिवस बंदी
मीरा भाईंदरमध्ये मांस विक्री बंदीवरून राजकीय रणकंदन! भाजपच्या नगरसेवकांची 8 दिवस बंदीची मागणी; मनसेचा तीव्र विरोध
जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी...
Manoj Jarange Patil | जरांगे पाटील आणि सरकारची बोलणी पुन्हा फिस्कटली? 58 लाख कुणबी प्रमाणपत्रांवर ठाम; GR झाल्याशिवाय माघार नाहीच
फडणवीस दिल्लीत जाणार; राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर
Sanjay Raut | फडणवीस दिल्लीत जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा; भाजपच्या अंतर्गत घडामोडींवर सूचक विधान
मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? बापटांवरील हल्ल्यावर पवारांचा संताप
Sharad Pawar | मत व्यक्त केलं म्हणून हल्ला? विद्यानंद बापटांवरील हल्ल्यावर शरद पवारांचा संताप; हा लोकशाही आणि मूलभूत अधिकारांवर हल्ला
मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई...
CM Fadnavis | मुंबईसाठी फडणवीसांचा मोठा प्लॅन! पुढील 10 वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; तिसऱ्या मुंबईचेही संकेत