Abhijeet Dipke : तुम्ही घाबरता कशाला? अभिजीत दिपके विरोधी पक्षाला खूप काही बोलून गेले, एक-एक ओळ जिव्हारी लागणारी

निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या वादात कॉक्रोच जनता पार्टीची एन्ट्री झाली आहे.

Abhijeet Dipke : तुम्ही घाबरता कशाला? अभिजीत दिपके विरोधी पक्षाला खूप काही बोलून गेले, एक-एक ओळ जिव्हारी लागणारी
abhijeet dipke
Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 25, 2026 | 12:12 PM

निवडणूक आयोगातील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिपकेंनी ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. एकीकडे निवडणूक आयोगावर टीका करत असताना दुसरीकडे विरोधी पक्षांनाही घेरलं आहे. विरोधी पक्षांना अस्तित्व गमावण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे निवडणूक लढतात, अशा शब्दात दिपकेंनी विरोधकांना सुनावलं आहे. दिपकेंनी विरोधकांवर टीका केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून विरोधकांना सुनावलं. त्यांनी म्हटलं की, निवडणुकीत हेराफेरी होत असल्याचे समोर येत आहे. त्यानंतरही विरोधी पक्ष निवडणुकीत सहभागी होत आहे. ते निवडणुकीला मान्यता देतात. त्यामुळे निवडणुका निष्पक्ष असल्याचा प्रचार होण्यास मदत मिळते. तुम्ही निवडणुका लढतात. कारण तुम्हाला अस्तित्व गमावण्याची भीती वाटते’.

‘मतांची चोरी होत आहे. आमदार आणि खासदार फोडले जात आहेत. पक्षात फूट पाडली जात आहे. त्यानंतरही तुम्ही कोणत्या प्रकारचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रयत्न करत आहात. याला राजकीय अस्तित्व टिकवणे म्हणता येणार नाही, तर तुम्ही फक्त व्यवस्थेत टिकून राहण्याचा प्रयत्न करत आहात. तुम्ही असे किती काळ टिकाल? असा सवाल दिपकेंनी उपस्थित केला.

दिपके पुढे म्हणाले, तुम्हाला निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार होत असल्याचे माहीत आहे. त्यानंतरही तुम्ही या निवडणुकीत सहभागी होता. एक प्रकारे तुम्ही हेराफेरी झालेल्या निवडणुकींना बळ देताय. तुम्ही राजकीय अस्तित्वाचा विचार करण्याऐवजी देश आणि त्यातील लोकशाहीचा विचार करावा. तुम्ही कठोर भूमिका घेऊन या निवडणुकांमध्ये सहभागी होणे थांबवावे’. ‘क्रिकेटच्या फिक्स मॅचमध्ये प्रत्येक कॅच सोडली जात नाही. मॅचमध्ये मोजके कॅच घेतले जातात. मॅच अतितटीची वाटावी, यासाठी शेवटच्या ओव्हरपर्यंत सामना खेळवला जातो. त्याचप्रमाणे तुम्ही निवडणुकीत काही ठिकाणी जिंकता. त्यामुळे निवडणुकीवर विश्वास निर्माण होतो. जसं की हा सामना खरा आहे,असे दिपके पुढे म्हणाले. आता अभिजीत दिपके यांच्या या आव्हानाला किती विरोधक प्रतिसाद देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us