शब्द नव्हते, डोळ्यात पाणी, हिंमत हरलो, पण…; अभिजीत दीपकेंनी मनातलं सगळं सांगितलं
अभिजीत दीपके हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावेळी पश्चिम बंगालच्या सीजेपी कार्यकर्ता अब्दुलशी बोलणे झाल्याचे सांगितले.

दिल्लीतील जंतरमंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मोठं यश मिळाल्यानंतर आता नवीन अभियान हाती घेतलं आहे. अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात देशभरात ‘स्कूल ठीक करो’ अभियान राबवलं जात आहे. देशभरातील विविध सीजेपी कार्यकर्ते ‘स्कूल ठीक करो’ अभियानात सहभागी झाले आहेत. या अभियानादरम्यान पश्चिम बंगालमध्ये धक्कादायक घटना घडली. कथित राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीत एका अब्दुल नावाच्या सीजीपी कार्यकर्त्याच्या वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. या अब्दुलशी अभिजीत दीपकेंनी काल संवाद साधला. त्यावेळी रडू आल्याचे दीपकेंनी सांगितले.
दीपके लिंबाळा मक्ता गावात
अभिजीत दीपके आज हिंगोलीच्या दौऱ्यावर आहेत. दीपके हे लिंबाळा मक्ता गावात दाखल झाले. त्यानंतर त्यांनी गावातील शाळांची पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दीपकेंनी म्हटलं की, स्कूल ठीक करो…आंदोलन देशभर सुरू आहे. काल पश्चिम बंगालच्या अब्दुलशी बोलणं झालं. मी त्याला काही लागलं तर सांग,असल्याचे सांगितले. तो बोलला की, माझे वडील गेले. परंतु शाळांवर काम सुरू केलं, ते थांबवायचं नाही. आता वडील राहिले नाहीत. त्यांची ज्या गोष्टीसाठी हत्या करण्यात आली. त्यांचा मृत्यू व्यर्थ गेला नाही पाहिजे. शाळांवर काम करत राहू. अब्दुलच्या वडिलांना जाऊन एक आठवडा झाला नाही, तरी त्याने शाळा नीट होत नाही, तोपर्यंत लढायचे, असे सांगितले.
हिंमत हरलो, पण… – दीपके
‘मी अब्दुलला फोन केला. त्यावेळी शब्द नव्हते. माझ्या डोळ्यातून पाणी आलं. तर त्याने सांगितलं की, दादा रडू नको. मला शाळा नीट करायच्या आहेत. जिथं मी हिंमत हरलो. तिथे अब्दुल वडील जाऊनही मला हिंम्मत देत होता. हे मुलं ऐवढे, स्वत:चे वडील जाऊनही शाळा सुधारण्याची भाषा करत असेल, तर त्यांचे देशावरील प्रेम पाहा. पंरतु हे आपल्याला हिंदू-मुस्लिमच्या राजकारणात अडकवतात, असे दीपकेंनी पुढे सांगितले.
राजकीय पक्षांकडून येणार्या ऑफरवर अभिजीत दीपके म्हणाले, ‘आमच्या आंदोलनाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. राजकारणविरहित लढाई करत असल्याने लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. राजकीय नेते उद्या जाऊन निवडणुका लढतील. पन्नास खोके, एकदम ओके बोलतील. पंरतु आम्ही राजकारणविरहित काम करणार आहोत. आम्ही शिक्षण, बेरोजगारीचे मुद्दे उचलणार आहोत. आम्ही राजकारणात न उतरता खूप काही करून दाखवलं आहे’.