मुंबई-अहमदाबाद एक्सप्रेसवर दोन बाईक रायडर्सचा जागीच मृत्यू, वळण आलं पण ब्रेक लागला नाही अन्….

फिल्मी स्टाईलने बाईक चालवणारा बाईक रायडरचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मुंबई-अहमदाबाद एक्सप्रेसवर दोन बाईक रायडर्सचा जागीच मृत्यू, वळण आलं पण ब्रेक लागला नाही अन्....
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 4:53 PM

पालघर : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी उड्डाणपुलावरील वळणावर मुंबईच्या दिशेने जात असताना एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन बाईकस्वारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. फिल्मी स्टाईलने बाईक चालवणारा बाईक रायडरचा अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. (accident on Mumbai Ahmedabad Expressway 2 Bike rider died on spot)

मिळालेल्या माहितीनुसार, बाईकस्वार उड्डाणपुलाच्या कठड्याला ठोकून खाली पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. सिद्धेश परब वय 22 रा. मीरारोड  याचा  जागीच  मृत्यू झाला. त्याच्या मागे बसलेल्या सनद यादव वय वर्षे 24 याला देखील गंभीर दुखापत झाली असून  त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याची प्रकृती ठीक असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. तर या अपघातानंतर आणखी एकाचा बाईक रायडरचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.

काही अंतरावर महालक्ष्मी ते आंबोली दरम्यान आणखी एका बाईक रायडरचा अपघातात मृत्यू झाला. मनीष राऊत वय वर्षे 38 राहणार सफाळे पालघर याचादेखील अपघातात मृत्यू झाला आहे. ट्रेलरने धडक दिल्याने अपघात त्याचा मृत्यू झाला. या दोन्ही अपघाताच्या ठिकाणी पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळावरून दोन्ही बाईक रायडरचा मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी नजिकच्या स्थानिक रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. खरंतर, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय वाहिनीवर सध्या अपघाताची मालिका कायम सुरू आहे.  नेहमीप्रमाणे रविवार हा सुट्टीचा दिवस असल्याने अनेक बाईक रायडिंगसाठी निघतात. यात तरुणांचा गाडीच्या वेगावर लक्ष नसतं. त्यामुळे अशा अपघाताच्या वारंवार घटना समोर येत असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे. (accident on Mumbai Ahmedabad Expressway 2 Bike rider died on spot)

संबंधित बातम्या – 

‘टीव्ही 9 मराठी इम्पॅक्ट: भंडारा दुर्घटना चौकशी समितीच्या अध्यक्षपदावरून डॉ. साधना तायडेंना हटवले, मुख्यमंत्र्यांची माहिती

“देव तारी त्याला कोण मारी”, रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी दिले जीवनदान

(accident on Mumbai Ahmedabad Expressway 2 Bike rider died on spot)

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.