“देव तारी त्याला कोण मारी”, रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी दिले जीवनदान

देव तारी त्याला कोण मारी, रेल्वेखाली जाणाऱ्या महिलेला पोलिसांनी दिले जीवनदान

दैव बलवत्तर म्हणून तिथे असलेल्या दोन पोलिसांनी महिलेचे प्राण वाचवले. हृदयाचा ठोका चुकवणारा हा थरार प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे

Nupur Chilkulwar

|

Jan 10, 2021 | 3:16 PM

ठाणे :देव तारी त्याला कोण मारी” ही म्हण खरी ठरवणारी घटना काल ठाण्यात घडली (Police Saved Woman Who Fall From Train). रेल्वेतून घाईघाईने उतरणाच्या प्रयत्नात एक महिला फलाटावर पडली आणि गडगडत ट्रेनखाली जाऊ लागली. दैव बलवत्तर म्हणून तिथे असलेल्या दोन पोलिसांनी महिलेचे प्राण वाचवले. हृदयाचा ठोका चुकवणारा हा थरार प्लॅटफॉर्मवरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे (Police Saved Woman Who Fall From Train).

नेमकं काय घडलं?

काल सकाळी ठाण्यातील फलाट क्र. 5 वर आलेल्या महानगरी एक्स्प्रेस मधून धनपट्टी राजू भारद्वाज नामक महिला प्रवासी घाईघाईने उतरण्याचा प्रयत्न करत होती. परंतु गाडीच्या वेगाचा अंदाज न आल्याने सदरची महिला फलाटावर पडली आणि गडगडत ट्रेन खाली जाऊ लागली. हे सगळं इतक्या झटपट झालं की कोणाला काही कळलंच नाही.

परंतु सदरच्या महिलेचे दैव बलवत्तर असल्याने दोन पोलीस कर्मचारी जणू देवदूत बणून तिच्या मदतीला धावले. ऑन ड्युटी सहपोलीस निरिक्षक नितीन पाटील आणि एएसआय सत्तार शेख हे नशिबाने तिथेच गस्त घालत होते. त्यांनी हा प्रकार पाहताच पापणीचे पाते लवण्याआधीच त्यांनी क्षणार्धात झेप घेऊन ट्रेन खाली जाणाऱ्या त्या महिलेचे पाय खेचून तिला जीवनदान दिले.

या दोन्ही निधड्या छातीच्या पोलिसांनी आपल्या जीवाची पर्वा न करता आपल्या कर्तव्याचे पालन केले. धनपट्टी हिचे पती राजू भारद्वाज यांनी पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले. पोलिसांच्या या जबरदस्त कामगिरीचे चित्तथरारक चित्रण सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Police Saved Woman Who Fall From Train

संबंधित बातम्या :

Indian Railway: रेल्वे विभाग तिकिटाचे पूर्ण पैसे परत करणार, त्यासाठी ‘हे’ नियम वाचा

सैन्यात आणि रेल्वेत नोकरी देण्याच्या नावावर फसवणूक, दिल्लीत हवाईदलाच्या माजी अधिकाऱ्याला अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें