AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune firing case : निलेश घायवळनं पासपोर्ट मिळवण्यासाठी केलं मोठं कांड, लंडनला कसा पळाला? पोलिसांचा मोठा खुलासा

पुण्यातील गोळीबार प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर निलेश घायवळ हा लंडनला पळून गेला आहे, मात्र त्याला पासपोर्ट नेमका कसा मिळाला? याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Pune firing case : निलेश घायवळनं पासपोर्ट मिळवण्यासाठी केलं मोठं कांड, लंडनला कसा पळाला? पोलिसांचा मोठा खुलासा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 29, 2025 | 6:29 PM
Share

काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोथरूड भागात गोळीबाराची घटना घडली होती. पोलीस स्टेशनपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर एका तरुणावर गोळीबार करण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात गुंड निलेश घायवळ याच्यासह दहा जणांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारीविरोधी कायदा मकोका अंतर्गत कारवाई केली. गुन्हा दाखल होताच निलेश घायवळ हा फरार झाला. दरम्यान तो लंडनला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर निलेश घायवळ याच्यावर मकोका सारखा गंभीर गुन्हा दाखल असताना, तो लंडनला कसा पळून गेला आणि त्याला पासपोर्टन नेमका कसा मिळाला? असे प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. आता या प्रकरणात आणि निलेश घायवळच्या पासपोर्ट संदर्भात पोलिसांकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.

पोलिसांनी काय म्हटलं?

पुण्यातील गोळीबार प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर निलेश घायवळ हा लंडनला पळून गेला आहे, मात्र त्याला पासपोर्ट नेमका कसा मिळाला? याबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे. निलेश घायवळ याने पासपोर्ट काढताना सुद्धा मोठं कांड केलं आहे. पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणात आरोपी असलेल्या घायवळ टोळीचा प्रमुख निलेश घायवळने पासपोर्ट काढण्यासाठी चुकीचा पत्ता दिल्याचे तपासातून समोर आलं आहे.

शासनाच्या अनेक यंत्रणांची फसवणूक करून निलेश घायवळने पासपोर्ट मिळवला असल्याची माहिती आता पोलिसांनी दिली आहे. पुण्यात त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्याला पासपोर्ट मिळाला नसता, त्यामुळे त्याने थेट अहिल्यानगरमधील एक चुकीचा पत्ता दाखवत संबंधित यंत्रणांकडे कागदपत्रे सादर केली, आणि पासपोर्ट मिळवला. दरम्यान त्याने पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर अहिल्यानगर पोलिसांनी त्याने अहिल्यानगर येथील जो पत्ता सांगितला होता, त्या पत्त्यावर जाऊन पाहाणी केली होती, मात्र तो तिथे आढळून आला नाही. त्यानंतर पोलिसांनी पत्त्यावर घायवळ आढळून आला नाही, घायवळ “not available” असा शेरा देखील दिला. मात्र तरी सुद्धा त्याला पासपोर्ट नेमका कसा मिळाला असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. घायवळ हा लंडनला पळून गेला असून, पुणे पोलिसांनी त्याच्याविरोधात लुक आऊट नोटीस जारी केली आहे, पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा