औरंगाबादः 8 महिने पोलिसांना गुंगारा देणारा पोलिसांच्या जाळ्यात, अल्पवयीन मुलीला फूस लावण्याचे प्रकरण

| Updated on: Nov 02, 2021 | 2:55 PM

औरंगाबादः मार्च महिन्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रविवारी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी (Aurangabad police) ही कारवाई केली. पळशी येथील अल्पवयीन मुलीला आरोपीने पळवले होते. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपीने सतत 8 महिने वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसांना गुंगारा दिला. अखेर तो अमरावतीत जाणार असल्याचे […]

औरंगाबादः 8 महिने पोलिसांना गुंगारा देणारा पोलिसांच्या जाळ्यात, अल्पवयीन मुलीला फूस लावण्याचे प्रकरण
आठ महिन्यानंतर अल्पवयीन मुलीला पळवणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात
Follow us on

औरंगाबादः मार्च महिन्यात एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवणारा आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला. रविवारी औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी (Aurangabad police) ही कारवाई केली. पळशी येथील अल्पवयीन मुलीला आरोपीने पळवले होते. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आरोपीने सतत 8 महिने वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसांना गुंगारा दिला. अखेर तो अमरावतीत जाणार असल्याचे कळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला जेरबंद केले.

नातेवाईकांच्या घरून पळवले होते

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बापू सुभाष काळे (38 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. शहरातील आरोपीच्या घराशेजारी मुलीचे नातेवाईक राहता. अल्पवयीन मुलगी काही दिवस नातेवाइकाकडे राहिली. या दरम्यान मुलीची आरोपीशी ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला 6 मार्च रोजी फूस लावून पळवले होते. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी त्याचा बराच शोध घेतला. पण तो सापडत नव्हता. त्यामुळे पोलिसांनाही बराच मनस्ताप सहन करावा लागला.

हेल्मेट घालून फिरत होता

वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलीस आरोपीचा शोध घेत होती. मात्र तो पासपड नव्हता. यामुळे मलीच्या आई-वडिलांनी माहिती देणाऱ्यासाठी 21 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. शिवाय पोलिसांनी सोशल मीडियावर त्याचे फोटो व्हायरल केले होते. अशा स्थितीत आपली ओळख पटू नये म्हणून आरोपी हेल्मेट घालून फिरत होता. अशा प्रकारे पोलिसांना या आरोपीने तब्बल आठ महिने गुंगारा दिला.

अमरावतीत ट्रॅप झाल्यावर आरोपीही चक्रावला

अनेक प्रकारे तपास करूनही आरोपी हाती लागत नसल्यामुळे हा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे यांच्याकडे देण्यात आला होता. चार-पाच दिवसांपूर्वीच तो औरंगाबादच्या हर्सूल परिसरात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परंतु आरोपीला याचा सुगावा लागताच तो पसार झाला होता. औरंगाबादहून आरोपीने एका टेम्पोत घरातील सामान शिफ्ट केले व त्याने अमरावती गाठली. या दरम्याना त्याचा मोबाइलदेखील ट्रेस झाला. ही माहिती मिळताच पोलिसांनी टेम्पोचा तपास लावत चालकाला ताब्यात घेतले. त्याला विश्वासात घेत चालकाच्या मदतीने अमरावतीत या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. थेट अमरावतीत पोलिसांना पोलिसांना पाहून काही काळ आरोपीदेखील चक्रावून गेला होता. दरम्यान रविवारी रात्री पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्याचे आदेश दिले तर मुलीला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. हा आरोपी दोन बायकांचा दादला असून त्याला एक मुलगा व एक मुलगी असल्याचेही उघड झाले.

इतर बातम्या-

लेबर कॉलनी क्वार्टरवर दिवाळीनंतर बुलडोझर फिरणार, कारवाईच्या नोटिसीने रहिवासी धास्तावले, इम्तियाज यांची भेट

औरंगाबादः सातारा देवळाईतील नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही, आमदार संजय शिरसाट यांचं वक्तव्य