Competitive Exam : सीडी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश सुरु

| Updated on: Jul 05, 2022 | 5:25 PM

सदर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती व सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महानगरपालिकेच्या wwww.thanecity.gov.in व संस्थेच्या www.cdinstitute.net तसेच www.cdinstitute.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे.

Competitive Exam : सीडी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या मार्गदर्शन वर्गासाठी प्रवेश सुरु
UGC NET 2022
Image Credit source: tv9
Follow us on

ठाणे : प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत अग्रगण्य नाव असलेल्या ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या वतीने स्पर्धा परीक्षा (Competitive Exam) पूर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या निःशुल्क मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून प्रवेश परीक्षेसाठी अर्ज (Application) मागविण्यात आले आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा (Dr. Vipin Sharma) यांनी केले आहे. ठाणे महापालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था ही केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत घेतल्या जाणाऱ्या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांना निःशुल्क मार्गदर्शन करणारी अग्रगण्य संस्था आहे. तसेच, अशा पद्धतीने प्रशासकीय प्रशिक्षण संस्था चालविणारी ठाणे महापालिका ही देशातील एकमेव महानगरपालिका आहे.

स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

स्पर्धा परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यासाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे (Foundation Course) आयोजन करण्यात आले आहे. या वर्गात प्रवेश घेण्याकरीता उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान, वाणिज्य, कला शाखेत व पदविका परीक्षेत (Diploma Course) किमान 70 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत. तरी इच्छुक विद्यार्थ्यांनी दिनांक 04 जुलै, 2022 ते 29 जुलै, 2022 पर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कार्यालयीन वेळेत उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला (स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट) आणि स्टॅम्प साईज छायाचित्राच्या दोन प्रतीसह संस्थेकडील उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. टपालद्वारे, कुरिअरद्वारे तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

सदर प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती व सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महानगरपालिकेच्या wwww.thanecity.gov.in व संस्थेच्या www.cdinstitute.net तसेच www.cdinstitute.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आलेली आहे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्ठेच्या वतीने करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सुसज्ज ग्रंथालय

प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक पुस्तके खरेदी करते. तसेच सकाळी 8 ते रात्री 10 पर्यंत येथील अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली असून वायफाय-इंटरनेट सुविधाही विनामूल्य देण्यात आली आहे.

उल्लेखनीय कामगिरी

ठाणे महापालिकेने सन 1987 मध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली. तेव्हापासून आजतागायत सदर संस्थेतून एकूण 68 विद्यार्थी / प्रशिक्षणार्थीनी भारतीय प्रशासकीय सेवा (आय.ए.एस.), भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.), इतर संलग्न स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) व इतर संलग्न स्पर्धा परीक्षांमध्ये संस्थेतील एकूण 400 पेक्षा अधिक विद्यार्थी / प्रशिक्षणार्थीनी यश संपादन केलेले आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. ठाण्यासाठी ही संस्था भूषण आहे. (Admission started for the guidance class of CD Deshmukh Administrative Training Institute)