‘ब्राम्हण असाल तर तुम्हाला प्राधान्य!’ कोणती आहे ती वादग्रस्त जाहिरात ज्यावर भडकले आव्हाड?

| Updated on: Feb 13, 2022 | 5:37 PM

आराधना बिल्डरची एक जाहीरात त्यांनी ट्विट केली आहे. त्यातल्या एका ओळीवर आव्हाडांनी आक्षेप घेतला आहे. आराधना बिल्डरच्या (Aradhana builders) जाहीरातीत ब्राम्हण (Bhrahman) उमेदवारांना प्रधान्य दिलं जाईल असे लिहले आहे.

ब्राम्हण असाल तर तुम्हाला प्राधान्य! कोणती आहे ती वादग्रस्त जाहिरात ज्यावर भडकले आव्हाड?
घर विकताना सोसायटीच्या NOC ची गरज नाही
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी एक फोटो ट्विट करत हल्लाबोल चढवला आहे. आराधना बिल्डरची एक जाहीरात त्यांनी ट्विट केली आहे. त्यातल्या एका ओळीवर आव्हाडांनी आक्षेप घेतला आहे. आराधना बिल्डरच्या (Aradhana builders) जाहीरातीत ब्राम्हण (Bhrahman) उमेदवारांना प्रधान्य दिलं जाईल असे लिहले आहे. हा फोटो ट्विट करत हा जातीभेद नाही का? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी विचारला आहे. तसेच आम्ही बहुजन समाजाची बाजू घेतली की आम्हाला गुन्हेगार ठरवलं जातं असेही आव्हाड म्हणाले आहेत. अशा एखाद्या जातीच्या उमेदवाराला प्राधान्य देण्याच्या ओळीवर आता जोरदार टीका होत आहे. कुठेही नोकरीच्या ठिकाणी जात नाही तर योग्यता पाहिली द्यावी. अशी मागणी होत असताना अशा पद्धतीची जाहीरात आव्हाड यांनी ट्विट केल्याने आता पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे.

आव्हाडांचं ट्विट काय?

ओबीसी जनगणनेवरूनही आक्रमक

ओबीसींच्या जनगणनेच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या देशात कुत्र्या, मांजराची गणना होते. मग ओबीसींची जनगणना का होत नाही? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचा ओबीसी मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला संबोधित करताना आव्हाड यांनी हा संतप्त सवाल केला. मंडल आयोगामुळे तुमच्यातील महापौर निर्माण झाला. सोलापुरात कलाल समाजाची पहिली महापौर झाली ते मंडल आयोगामुळेच. हा दारु विकणारा समाज आहे. पूर्वी शिंप्याचं काम करायचा. बिहारमध्ये पिछडा वर्ग आहे. त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव आहे. मात्र, महाराष्ट्रात जातीबाबत ओळख नाही. हे दुर्देव आहे, असं आव्हाड म्हणाले. यावेळी आव्हाड यांनी स्टेजवर खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन पारंपारिक वेषात स्टेजवर प्रवेश केला. यावेळी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.

गप्प बसून चालणार नाही-आव्हाड

तुम्हाला चूप बसून आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी जोरात ओरडा. आपल्यालाही ही लढाई निकराने लढावी लागेल. त्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडावे लागेल, असं सांगतानाच आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. शोषित आणि वंचितांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलं गेलं आहे. शोषित लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी सांगितलं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. कुत्र्यांची गणना होते. मात्र, ओबीसींची जनगणना का होत नाही? असा सवालही त्यांनी केला.

कुत्र्या-मांजरांची गणना होते, मग ओबीसींची जनगणना का होत नाही?; जितेंद्र आव्हाड भडकले

तुम्ही पाटील आहात जोशी बुवाचं काम कधीपासून करायला लागलात?; भुजबळांचा चंद्रकांतदादांना खोचक सवाल

सोमय्या म्हणाले, कोव्हिड घोटाळ्याला ठाकरे जबाबदार, आदित्य म्हणतात, सगळीकडचा गाळ काढण्याचं काम करतोय