कुत्र्या-मांजरांची गणना होते, मग ओबीसींची जनगणना का होत नाही?; जितेंद्र आव्हाड भडकले

ओबीसींच्या जनगणनेच्या मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या देशात कुत्र्या, मांजराची गणना होते. मग ओबीसींची जनगणना का होत नाही? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

कुत्र्या-मांजरांची गणना होते, मग ओबीसींची जनगणना का होत नाही?; जितेंद्र आव्हाड भडकले
कुत्र्या-मांजरांची गणना होते, मग ओबीसींची जनगणना का होत नाही?; जितेंद्र आव्हाड भडकले
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 2:54 PM

ठाणे: ओबीसींच्या जनगणनेच्या (obc) मुद्द्यावरून राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (jitendra awhad) यांनी प्रचंड संताप व्यक्त केला. या देशात कुत्र्या, मांजराची गणना होते. मग ओबीसींची जनगणना का होत नाही? असा संतप्त सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. ठाण्यात राष्ट्रवादीचा (ncp) ओबीसी मेळावा सुरू आहे. या मेळाव्याला संबोधित करताना आव्हाड यांनी हा संतप्त सवाल केला. मंडल आयोगामुळे तुमच्यातील महापौर निर्माण झाला. सोलापुरात कलाल समाजाची पहिली महापौर झाली ते मंडल आयोगामुळेच. हा दारु विकणारा समाज आहे. पूर्वी शिंप्याचं काम करायचा. बिहारमध्ये पिछडा वर्ग आहे. त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव आहे. मात्र, महाराष्ट्रात जातीबाबत ओळख नाही. हे दुर्देव आहे, असं आव्हाड म्हणाले. यावेळी आव्हाड यांनी स्टेजवर खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी घेऊन पारंपारिक वेषात स्टेजवर प्रवेश केला. यावेळी त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं.

तुम्हाला चूप बसून आरक्षण मिळणार नाही. त्यासाठी जोरात ओरडा. आपल्यालाही ही लढाई निकराने लढावी लागेल. त्यासाठी बेंबीच्या देठापासून ओरडावे लागेल, असं सांगतानाच आरक्षण हा काही दारिद्र्य निर्मूलनाचा कार्यक्रम नाही. शोषित आणि वंचितांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी आरक्षण दिलं गेलं आहे. शोषित लोकांना आरक्षण मिळालं पाहिजे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी सांगितलं आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. कुत्र्यांची गणना होते. मात्र, ओबीसींची जनगणना का होत नाही? असा सवालही त्यांनी केला.

मंडल आयोगामुळेच महापौर झाला

आपल्याकडे 354 जाती आहेत. अनेक जातीचे लोक आले आहेत. मी स्वतःच ओबीसी आहे. मी राजकारण केले नाही. पण आपल्या बांधवांसाठी मला लढावे लागणार आहे. महाराष्ट्रात डोक्यावर छप्पर नाही असा सर्वाधिक समाज हा आदिवासी आणि भटका आहे. पण आपण मागासवर्गीय आहे हे सांगायची लाज वाटते काहींना, असं सांगतानाच मोदींना कुणी काय दिले यावर मी बोलणार नाही. पण मंडल आयोगामुळे तुमच्यातील महापौर निर्माण झाला. सोलापुरात कलाल समाजाची पहिली महापौर झाली ते मंडल आयोगामुळेच. हा दारु विकणारा समाज आहे. पूर्वी शिंप्याचं काम करायचा. बिहारमध्ये पिछडा वर्ग आहे. त्यांना आपल्या अधिकाराची जाणीव आहे. मात्र, महाराष्ट्रात जातीबाबत ओळख नाही. हे दुर्देव आहे, असं ते म्हणाले.

ते तुमच्या आरक्षणाला कसा पाठिंबा देणार?

शहरीकरणामुळे 100 मुलांपैकी 8 जण पदवीधर होत आहेत. ओबीसींमध्ये शाळा सोडण्याचं प्रमाण वाढलं आहे. ज्या संघटनेने संविधानाला विरोध केला. मग ते लोक तुमच्या आरक्षणाला पाठिंबा कसा देणार? त्यांनी कर्नाटकात तिरंगा खाली आणला. आम्हाला भगव्याबाबत अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला आमचा सलामच आहे, असंही ते म्हणाले.

फुले-आंबेडकरांचे फोटो लावा

ओबीसी समाज पुढे जात असल्याने काही लोकांच्या डोळ्यात खूपत आहे. घर काम करणाऱ्या मातेचा मुलगा इंजीनियर होतो. हे आता काही लोकांना खूपत आहे, असं सांगतानाच तुमच्या घरात आणि देवघरात महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

हिजाब सुरुवात है, किताब बाकी है

यावेळी त्यांनी हिजाबच्या मुद्द्यावरूनही केंद्र सरकारला इशारा दिला. ‘हिजाब’ तो सुरवात है ‘किताब’ अभी बाकी है, असा इशारा त्यांनी दिला. स्कर्ट घालायचे नाही. हिजाब घालायचा नाही, हे श्रीराम सेना ठरवणार का? आता मोदींच्या मिनिस्ट्रित ड्रेस कोड ठरवला पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला.

संबंधित बातम्या:

तुम्ही पाटील आहात जोशी बुवाचं काम कधीपासून करायला लागलात?; भुजबळांचा चंद्रकांतदादांना खोचक सवाल

मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, नाना पटोलेंचा इशारा; भाजपच्या एकमेव धर्माचाही उद्धार…!

Maharashtra News Live Update : वाईन आमची संस्कृती आहे का?, अण्णा हजारेंचा सवाल

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.