मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, नाना पटोलेंचा इशारा; भाजपच्या एकमेव धर्माचाही उद्धार…!

नाना पटोले म्हणाले की, वाचाळ बोलणे लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपला आता सत्तेचा रोग झाला आहे.

मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, नाना पटोलेंचा इशारा; भाजपच्या एकमेव धर्माचाही उद्धार...!
पंतप्रधान नरेंद्र मोदी, नाना पटोले
Follow us
| Updated on: Feb 13, 2022 | 1:58 PM

मुंबईः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महाराष्ट्राला कोरोना सुपरस्प्रेडर संबोधले. हे लांच्छन जनता कदापि सहन करणआर नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी माफी मागेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुंबईत दिला. यावेळई त्यांनी भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील यांनाही लक्ष केले. ते म्हणाले, मला वाटतं की त्यांना मानसिक आजराचा त्रास आहे. कुठे विकासाची चर्चा करायची नाही. विरोधी पक्षाच काम सरकारला सूचना करणे, कुठे सरकार चुकत असेल तर विरोध करणे, ही विरोधी पक्षाची भूमिका असते. मात्र, चंद्रकांत दादा असतील किंवा फडणवीस असतील सातत्याने हे सरकार पडणार असल्याचे म्हणत आहेत. सरकार अस्थिर करून प्रशासकीय व्यवस्थेमध्ये काम न करण्याची एक व्यवस्था निर्माण करण्याचा काम करायचे आणि जनतेच नुकसान करायचे हाच एकमेव धर्म भाजपचा आहे.

वाचाळ बोलणे घातक

नाना पटोले म्हणाले की, वाचाळ बोलणे लोकशाहीसाठी घातक आहे. भाजपला आता सत्तेचा रोग झाला आहे. शिवाय त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले, मोदींनी महाराष्ट्रांना सुपर स्प्रेडर म्हटले. त्यांना महाराष्ट्र्राची माफी मागावीच लागणार आहे. महाराष्ट्राने कोरोना पसरवला म्हणणं असेल, तर नमस्ते ट्रम्प हे कशासाठी होतं, याच उत्तर त्यांनी द्यावं. कोरोना कुठून पसरला याची वास्तविकता देशाला सांगावी. महाराष्ट्राच्या जनतेवर लांच्छन लावणं हे महाराष्ट्राची जनता कधी ही सहन करणार नाही. मोदी माफी मागत नाहीत, तो पर्यंत हे आंदोलन चालत राहणार आहे, असा इशारा त्यांनी दिला. अण्णा हजारेंच्या वाईन उपोषणाबद्दल काही बोलणार नाही. कारण बोलण्यासारखं काहीच नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

धर्माचे राजकारण

नाना पटोले म्हणाले की, प्रत्येकाला प्रत्येकाचा पक्ष वाढवायचा अधिकार असतो. आमच्या पक्षात प्रवेश होत असतात. अजूनही काही पक्ष प्रवेश होतील. कोणी कुठला पक्षात प्रवेश करावा, हा माझ्या जगण्याचा अधिकार आहे. हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. आम्ही कुठलीही प्रलोभनं दाखवत नाहीत. भाजप हे नेहमी धर्माचे राजकारण केले. निवडणुका आल्या की त्यांना मुस्लिम आणि युनिफॉर्म सिव्हिल कोर्ट आठवतो. अशाच पद्धतीचे त्यांचं निवडणुकीचे राजकारण असतं, अशी टीका त्यांनी केली. यावेळी त्यांनी उद्योगपती राहुल बजाज यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले, राहुल बजाज यांच्या निधनाने एक पोकळी निर्माण झालेली आहे. एक उद्योग क्षेत्रात महत्त्वाचे व्यक्तिमत्व हरपले आहे.

इतर बातम्याः

महाराष्ट्राचा महापिता कर्नाटकाच्या मातीत एकाकी, समाधीवर साधे छप्परही नाही; पानिपतकारांच्या डोळ्यांत पाणी, पोटात गोळा!

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.