Rohit Pawar vs BJP : ‘जुना वारसा घेऊन, नवीन पुतण्या येतोय’ अजितदादांचे अंत्यविधी सुरु असताना हे..भाजपचा रोहित पवारांच्या जिव्हारी लागेल असा पलटवार

Rohit Pawar vs BJP : काल पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मफलर घातलेला फोटो दाखवून एकच खळबळ उडवून दिली. फडणवीसांच्या मफलर घातलेल्या फोटोत त्यांच्या शेजारी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचे पुत्र रोहित सिंग आहेत.

Rohit Pawar vs BJP : जुना वारसा घेऊन, नवीन पुतण्या येतोय अजितदादांचे अंत्यविधी सुरु असताना हे..भाजपचा रोहित पवारांच्या जिव्हारी लागेल असा पलटवार
Devendra Fadnavis-Rohit Pawar
| Updated on: Nov 17, 2026 | 11:56 AM

शरदचंद्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काल एक खळबळजनक दावा केला. आमदार रोहित पवार यांनी त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये मफलर मॅनचा उल्लेख केला होता. त्या मफलर मॅनचे बॅनरही लागले होते. त्यामुळे तो मफलर मॅन कोण? हा प्रश्न अनेकांना पडला होता. काल पत्रकार परिषदेत रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा मफलर घातलेला फोटो दाखवून एकच खळबळ उडवून दिली. फडणवीसांच्या मफलर घातलेल्या फोटोत त्यांच्या शेजारी व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीचे मालक व्ही. के. सिंग यांचे पुत्र रोहित सिंग हे आहेत. अजित पवार यांचं जे विमान कोसळलं ते याच व्हीएसआर कंपनीच्या मालकीचं होतं. देवेंद्र फडणवीस यांचा हा फोटो एका लग्नातला आहे. “लग्नाला ते गेले कारण संबंध जवळचे होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे संबंध असतील तर दादांना न्याय मिळेल का? अशा परिस्थितीत दादांना न्याय मिळेल का? असा रोहित पवारांनी सवाल विचारला.

या आरोपानंतर आता भाजपकडून रोहित पवारांवर पलटवार करण्यात आला आहे. “अजितदादांची जागा घेण्यासाठी रोहित पवार यांची पीआर टीम अजितदादांचे अंत्यविधी सुरु असताना सोशल मीडियावर ब्रँडिंग करत होती” असा आरोप भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत काही स्लाइड्सही दाखवल्या. “रोहित पवार यांची संपूर्ण टीम अजितदादांचा वारसा चालवण्यासाठी रोहित पवार किती सक्षम आहेत हे सांगण्याचा प्रयत्न करत होती. जुना वारसा घेऊन नवीन पुतण्या येतोय हे अंत्यविधी सुरु असताना रोहित पवारांची पीआर टीम पोस्ट करत होती” असा आरोप नवनाथ बन यांनी केला.

Loading...

टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न

“अजितदादांचे अंत्यसंस्कार झालेही नव्हते तेव्हा सोशल मीडियावर रोहित पवारांची टीम दादांचा वारसा रोहित पवारांकडे आहे असा प्रचार सुरु केला होता. अजितदादांच्या मृत्यूनंतर टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला. रोहित पवार हे अजितदादांचे अंत्यसंस्कार होण्यापूर्वी त्यांची जागा घेण्याचा प्रयत्न करत होते. अजितदादांच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी कशा पद्धतीचे राजकारण केलं हे महाराष्ट्राने बघितलं” अशी टीका नवनाथ बन यांनी केली.

वैभव सोलणकर यांनी पत्र लिहिलय

“रोहित पवारांच्या साखर कारखान्याची सखोल चौकशी व्हावी. रोहित पवारांच्या साखर कारखान्यामुळे दृश्यमानता कमी झाल्याची शक्यता आहे. रोहित पवारांच्या सांगण्यावरुन हे सर्व घडवून आणलं का? याची चौकशी व्हावी. अजित पवारांच्या मृत्यूनंतर सर्वाधिक फायदा घेण्याचा प्रयत्न रोहित पवारांकडून केला जातोय. वैभव सोलणकर यांनी पत्र लिहिलय त्याची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे” असं नवनाथ बन यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us