सिल्व्हर ओकवर हालचाली वाढल्या, पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची तब्बल दोन तासांपासून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसोबत चर्चा

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सिल्व्हर ओकवर घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांची गेल्या दोन तासांपासून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे.

सिल्व्हर ओकवर हालचाली वाढल्या, पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची तब्बल दोन तासांपासून राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांसोबत चर्चा
sharad pawar
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 07, 2026 | 9:09 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. सिल्व्हर ओकवर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार दोन दिवस रुग्णालयात होते, आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर शरद पवार हे सिल्व्हर ओक या आपल्या निवासस्थानी आले आहेत. दरम्यान त्यानंतर आता शरद पवार यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अनेक ज्येष्ठ नेते सिल्व्हर ओकवर आलेले आहेत. या नेत्यांसोबत गेल्या दोन तासांपासून शरद पवार यांची चर्चा सुरू आहे. यामध्ये शशिकांत शिंदे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील अशा वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. गेल्या दोन तासांपासून या नेत्यांसोबत शरद पवार यांची चर्चा सुरू आहे.

दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटातील नेते शरद पवार यांच्या भेटीला सिल्व्हर ओकवर येण्यापूर्वी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार यांनी देखील शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्यासोबत देखील दोन तास चर्चा केली. पार्थ पवार यांच्या भेटीनंतर आता शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे.  गेल्या दोन तासांहून अधिक काळ ही चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

Loading...

दरम्यान त्यापूर्वी शरद पवार हे रुग्णालयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. प्रफुल्ल पटेल यांच्या भेटीनंतर अचानक दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला वेग आला. त्यातच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी देखील मोठा गौप्यस्फोट केला. आता विलिनीकरणाची कोणतीही चर्चा नाही, परंतु अजित पवार असते तर 12 फेब्रुवारी रोजीच विलिनीकरण झालं असतं, त्यांनी मला तशी कल्पना दिली हेती, असा दावा तटकरे यांनी केला आहे. तटकरे यांच्या या दाव्यामुळे विलिनीकरणाच्या चर्चेला आणखी उधाण आलं आहे. दरम्यान त्यानंतर आता गेल्या दोन तासांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या बड्या नेत्यांसोबत चर्चा सुरू आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us