पाकिस्तानमध्ये 18 वर्ष कारावास, 15 दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या महिलेचा औरंगाबादेत मृत्यू

| Updated on: Feb 09, 2021 | 5:56 PM

हसीना बेगम या तब्बल 18 वर्षांनंतर पाकिस्तानातून औरंगाबादमध्ये परतल्या होत्या. (Pakistan Return Hasina Begum died)

पाकिस्तानमध्ये 18 वर्ष कारावास, 15 दिवसांपूर्वी मायदेशी परतलेल्या महिलेचा औरंगाबादेत मृत्यू
Follow us on

औरंगाबाद : अठरा वर्षानंतर पाकिस्तानातील तुरुंगातील कैदेतून सुटून औरंगाबादेत परतलेल्या वृद्धेचे निधन झाले आहे. हसीना बेगम असे या वृद्ध महिलेचे नाव आहे. हसीना बेगम यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे. पाकिस्तानातून परतल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच हसीना यांचा मृत्यू झाला आहे. (Pakistan Return Hasina Begum died in Aurangabad)

हसीना बेगम या तब्बल 18 वर्षांनंतर पाकिस्तानातून औरंगाबादमध्ये परतल्या होत्या. परक्या पाकिस्तानात राहूनही हसीना बेगम यांनी स्वत:च्या मायभूमीतच अखेरचा श्वास घेतला. पाकिस्तानातून परतल्यानंतर अवघ्या 15 दिवसातच हसीना यांचा मृत्यू झाला. हसीना यांचा कोणीही वारस नसल्याने नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी त्यांचा दफनविधी केला आहे.

नेमकं प्रकरणं काय?

हसिना बेगम या 18 वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नातेवाईंकांना भेटण्यासाठी पाकिस्तानात गेल्या होत्या. पाकिस्तानात गेल्यानंतर लाहौरमध्ये त्यांचं पासपोर्ट हरवलं. त्यामुळे त्या पाकिस्तानात अडकल्या. यानंतर पाकिस्तान पोलिसांनी हसिना यांना तुरुंगात कैद केलं. हसिना यांच्या सुटकेसाठी त्यांचा भाचा प्रयत्न करत होता. तब्बल 18 वर्षांपासून कुठल्याही गुन्ह्याशिवाय पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होत्या.

या प्रकरणात पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालय कार्यालयात विचारणा केली होती. हे प्रकरण पडताळणीसाठी औरंगाबाद शहर पोलिस आयुक्तालयात पाठविण्यात आले. सिटीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी या प्रकरणाचा तपास केला. (Pakistan Return Hasina Begum died in Aurangabad)

या प्रकरणाच्या तपासावेळी बेगम यांच्या नावे औरंगाबादमध्ये सिटी चौक पोलीस स्टेशनअंतर्गत एक घर रजिस्टर असल्याची माहिती आढळली. या कागदपत्रांच्या आधारे देशाची नागरिक असल्याचे सिद्ध झाले आणि हसीना बेगम यांची सुटका झाली. त्यांना भारतीय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलं. हसिना बेगम मंगळवारी प्रजासत्ताक दिनी (26 जानेवारी) भारतात परतल्या.

दरम्यान राशिदपुरा परिसरात राहणाऱ्या हसिना बेगम यांचं लग्न दिलशाद अहमद यांच्यासोबत झालं. ते उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचे राहणारे आहेत.

मी स्वर्गात आहे, हसिना बेगम यांची प्रतिक्रिया

भारतात परतल्यानंतर नातेवाईक आणि औरंगाबाद पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. “मी अत्यंत बिकट परिस्थितीत होती आणि आपल्या देशात परतल्यानंतर मला शांतीचा अनुभव होत आहे. मी स्वर्गात आहे, असे मला वाटतं आहे. मला पाकिस्तानात जबरदस्ती कैद करण्यात आलं होतं”. “या प्रकरणाची तक्रार दाखल केल्याबाबत मी औरंगाबाद पोलिसांचे आभार मानते”, अशी प्रतिक्रिया हसिना बेगम यांनी भारतात परतल्यानंतर दिली होती. (Pakistan Return Hasina Begum died in Aurangabad)

संबंधित बातम्या : 

नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानात, तब्बल 18 वर्षे जेलमध्ये, 65 वर्षीय हसिना बेगम औरंगाबादेत परतल्या