नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानात, तब्बल 18 वर्षे जेलमध्ये, 65 वर्षीय हसिना बेगम औरंगाबादेत परतल्या

भारताच्या 65 वर्षीय हसिना बेगम ज्या 18 वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटायला पाकिस्तानात गेल्या होत्या, त्या अखेर भारतात परतल्या आहेत.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 11:29 AM, 27 Jan 2021
नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानात, तब्बल 18 वर्षे जेलमध्ये, 65 वर्षीय हसिना बेगम औरंगाबादेत परतल्या
नातेवाईकांना भेटायला पाकिस्तानात गेली आणि 18 वर्ष तुरुंगात अडकली

औरंगाबाद : 65 वर्षीय हसिना बेगम ज्या 18 वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटायला (Woman Returned To India After 18 Years) पाकिस्तानात गेल्या होत्या, त्या अखेर भारतात परतल्या आहेत. 18 वर्षांपूर्वी जेव्हा त्या पाकिस्तानात गेल्या, तिथे लाहौरमध्ये त्यांचं पासपोर्ट हारवलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली आणि त्या तब्बल 18 वर्षांपासून कुठल्याही गुन्ह्याशिवाय पाकिस्तानच्या तुरुंगात कैद होत्या. आता अनेक वर्षांनंतर जेव्हा हे प्रकरण लक्षात आलं, तेव्हा औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली आणि अखेर पाठपुराव्यानंतर हसिना बेगम मंगळवारी प्रजासत्ताक दिनी  भारतात परतल्या (Woman Returned To India After 18 Years).

भारतात परतल्यानंतर नातेवाईक आणि औरंगाबाद पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. हसिना बेगम यांनी सांगितलं, “मी अत्यंत बिकट परिस्थितीत होती आणि आपल्या देशात परतल्यानंतर मला शांतीचा अनुभव होत आहे. मला वाटत आहे की मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानात जबरदस्ती कैद करण्यात आलं होतं”. “या प्रकरणाची तक्रार दाखल केल्याबाबत मी औरंगाबाद पोलिसांचे आभार मानते”, असंही त्या म्हणाल्या.

हसिना बेगम यांचे नातेवाईक ख्वाजा जैनुद्दीन चिश्तींनी औरंगाबाद पोलिसांनी त्यांना देशात परत आणण्यासाठी मदत केल्याबाबत धन्यवाद दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबादच्या सिटी चौक ठाणे क्षेत्राअंतर्गत येणाऱ्या राशिदपुरा परिसरात राहणाऱ्या हसिना बेगम यांचं लग्न दिलशाद अहमद यांच्यासोबत झालं. ते उत्तर प्रदेशच्या सहारनपूरचे राहणारे आहेत (Woman Returned To India After 18 Years).

पोलीस स्टेशनअंतर्गत घर रजिस्टर्ड

पाकिस्तानच्या न्यायालयात हसिना बेगम यांनी विनंती केली की त्या निर्दोष आहेत. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन भारतीय पोलिसांना संपर्क केला. पोलिसांकडून माहिती मिळवली. औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला सूचना पाठवली की बेगम यांच्यानावे औरंगाबादमध्ये सिटी चौक पोलीस स्टेशनअंतर्गत एक घर रजिस्टर्ड आहे. त्यानंतर पाकिस्तानने गेल्या आठवड्यात बेगम यांना सोडले आणि त्यांना भारतीय अधिकाऱ्यांच्या सुपूर्द केलं.

Woman Returned To India After 18 Years

संबंधित बातम्या :

पाकमधून आणलेल्या गीताचे आई-वडील नाशिकचे? टेस्ट होणार !

नांदेड : सुषमा स्वराजांमुळे पाकहून मायदेशी, गीताच्या कुटुंबाचा शोध सुरुच

भारतीय वंशाची गीतांजली राव ठरली ‘टाइम’च्या पहिल्या ‘किड ऑफ द इयर’ची मानकरी