भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्याला शिंदे गटानं डिवचलं, प्रवेशापूर्वीच जुन्या पोस्ट व्हायरल केल्यानं राजकीय वातावरण तापलं

| Updated on: Jan 27, 2023 | 8:55 AM

कधीकाळी भाजपात असलेल्या नेत्याने शिवसेनेसह ठाकरे गटावर केलेला टीकेचे पोस्टर आता शिंदे गटाकडून व्हायरल केले जात आहे. टीका करणारे नेते आता ठाकरे गटात प्रवेश करत आहे.

भाजपाला सोडचिठ्ठी दिलेल्या नेत्याला शिंदे गटानं डिवचलं, प्रवेशापूर्वीच जुन्या पोस्ट व्हायरल केल्यानं राजकीय वातावरण तापलं
Image Credit source: Google
Follow us on

मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव ( नाशिक ) : भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देऊन दादा भुसे यांच्या विरोधात दंड थोपटण्यासाठी अद्वय हिरे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहे. शिवसेना भवन येथे दुपारी चार वाजता उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थित अद्वय हिरे यांचा प्रवेश होणार आहे. त्यामुळे दादा भुसे यांना क्षह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी राजकीय खेळी करत एकाच दगडात दोन पक्षी मारले आहे. मात्र, मालेगाव शहरात अद्वय हिरे यांनीच भाजपमध्ये असतांना दादा भुसे यांना डिवचण्यासाठी अद्वय हिरे यांच्याच जुन्या पोस्ट काढून व्हायरल केल्या जात आहे. यामध्ये अद्वय हिरे यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्याच पोस्टचे मिम्स बनवत भुसे समर्थकांनी सोशल मीडियावर अद्वय हिरे यांना डिवचण्याचे काम सुरू केले आहे. प्रवेशाच्या पूर्वसंध्येला अद्वय हिरे यांचा लबाड लांडगं ढोंग करतंय अशी गाणी आणि पोस्टचे व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे.

शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर शिवसेना ठाकरे गटातून शिंदे गटात दादा भुसे दाखल झाले होते, त्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांची युती असल्याने अद्वय हिरे यांची मोठी राजकीय अडचण झाली होती.

हे सुद्धा वाचा

अद्वय हिरे यांना पुढील काळात दादा भुसे यांच्या विरोधात उमेदवारी करायची आहे, त्यासाठी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी स्थिती असतांना हिरे विरुद्ध भुसे असा सामना जवळपास निश्चित होता.

मात्र, राज्यात झालेल्या राजकीय उलथापालथ बघता अद्वय हिरे यांची अडचण झाली होती, त्यामुळे हिरे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश करण्याची भूमिका घेतली आहे.

हीच पक्षीय भूमिका अद्वय हिरे यांच्यासाठी दादा भुसे यांनी प्रवेशापूर्वी डोकेदुखी करून ठेवली आहे. दादा भुसे यांच्या पुत्रासह समर्थकांनी सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस पाडला आहे.

उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत सह शिवसेनेचा द्वेष करणारे आता स्वार्थापोटी उद्धव ठाकरे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याचा आरोप सोशल मीडियावरून भुसे यांच्या समर्थकांनी केलाय, त्यामुळे मालेगावात चर्चांना उधाण आले आहे.