तुमच्या कुकरच्या शिट्ट्या कधीच उडाल्या, विखे पाटलांचं भन्नाट प्रत्युत्तर, जोरदार चर्चा!

| Updated on: Apr 01, 2023 | 3:07 PM

संगमनेर तालुक्यातील 26 गावं शिर्डी विधानसभा मतदारसंघात जोडली गेली आहेत. तेव्हापासूनच विखे विरुद्ध थोरात वाद सतत सुरू आहेत. सध्या दोघेही विरोधी पक्षांमध्ये असल्याने उघडपणे टीका-टिप्पण्या सुरु आहेत.

तुमच्या कुकरच्या शिट्ट्या कधीच उडाल्या,  विखे पाटलांचं भन्नाट प्रत्युत्तर, जोरदार चर्चा!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मनोज गाडेकर, अहमदनगर : नाशिक (Nashik) पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि महाविकास आघाडी अंगर्तत रंगलेल्या कलहावरून आता चांगलीच टोलेबाजी रंगली आहे. शिर्डी (Shirdi) विधानसभा मतदार संघात दोन आजी-माजी महसूलमंत्र्यांमध्ये चांगलंच वाकयुद्ध रंगलं. दोन दिवसांपूर्वी शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत शिर्डी मतदार संघातील दहशतीचे झाकण उडवावं लागेल असा टोला राधाकृष्ण विखे यांना अप्रत्यक्षपणे लगावला होता. थोरात यांच्या या टीकेला महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर येथील कार्यक्रमात जोरदार प्रत्युत्तर दिलय. सत्ता गेल्यामुळे पोपटपंची सुरू असून तुमच्या कुकरच्या शिट्टया‌ कधीच उडाल्या आहेत, अशी टीका विखे पाटलांनी केली.

थोरात काय म्हणाले होते?

शिर्डी मतदारसंघात जिरवाजिरवीचा कार्यक्रम मोठा आहे..मात्र तुम्ही घाबरायचे सोडून द्या…शिर्डी मतदारसंघातील दहशतीचे झाकण उडवण्याचा कार्यक्रम आपल्याला करायचा आहे अशी टीका माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दोन दिवसांपूर्वी विखे पाटील यांच्या मतदार संघात केली होती.नेमक काय म्हणालेत थोरात ते पाहू या…

विखे पाटील यांचं जोरदार उत्तर

थोरात यांच्या या टीकेला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथे झालेल्या सभेत प्रत्युत्तर दिलय.आम्ही लोकांचा वाळू धंदा बंद केला ही तुम्हाला दहशत वाटते. सरकारचा पैसा जर कोणी लुटत असेल.. मी त्याच्यावर कारवाई करत असेल आणि ती तुम्हाला दहशत वाटत असेल तर त्याची मला चिंता नाही.. अशी टीका विखे यांनी थोरात यांच्यावर केलीय.. ही सगळी वक्तव्य सत्ता गेल्यामुळे केली जात आहेत.. सत्ता गेल्यामुळे ही पोपटपंची सुरू आहे.. सत्ता गेल्याचं त्यांना दुःख वाटतंय. त्यामुळे तुमच्या कुकरच्या शिट्ट्या केव्हाच उडाल्यात. आमचे झाकण उडायची वाट पाहू नका..तुमचे झाकण सांभाळा असा टोला विखे यांनी भाषणातून लगावलाय…

पदवीधर निवडणुकीत तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात प्रचार केला.. सोयीनुसार तुम्ही तालुक्याचा राजकारण करता.. ज्या महाविकास आघाडीचे नेते म्हणून तुम्ही काम करतात त्यांच्याशी तरी प्रामाणिक आहात का हा विचार तुम्ही केला पाहिजे असही विखे पाटील यांनी म्हटलंय.

राजकीय संघर्ष गडद होणार?

संगमनेर तालुक्यातील 26 गावं शिर्डी विधानसभा मतदारसंघात जोडली गेली आहेत. तेव्हापासूनच विखे विरुद्ध थोरात वाद सतत सुरू आहेत. विखे पाटील आणि थोरात दोघेही काँग्रेस पक्षात असताना देखील राजकीय संघर्ष पहायला मिळत होता. मात्र विखे पाटील आता भाजपमध्ये आणि थोरात कॉग्रेसमध्ये असल्याने एकमेकांचे थेट विरोधक झाले आहेत. उघडपणे टीका करताना दिसून येत असून एकमेकांच्या मतदार संघात आगपाखड करत असल्याने हा राजकीय संघर्ष कुठपर्यंत जाणार याकडे जिल्हयाचं लागलंय.