AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ajit Navale : काय गोळ्या घालायचा त्या घाला, आम्ही लोकशाही मार्गाने लढणार, अजित नवलेही मैदानात, मोठ्या आंदोलनाची तयारी

Ajit Navale on State Government: अजित नवले यांनी सरकारला आंदोलनावरून चांगलेच सुनावले आहे. आता किसान सभा सरकारविरोधात मैदानात उतरणार आहे. त्यांनी याविषयीची घोषणा केली आहे.

Ajit Navale : काय गोळ्या घालायचा त्या घाला, आम्ही लोकशाही मार्गाने लढणार, अजित नवलेही मैदानात, मोठ्या आंदोलनाची तयारी
काय गोळ्या घालायचा त्या घाला, आम्ही लोकशाही मार्गाने लढणार, अजित नवलेही मैदानात
| Updated on: Oct 22, 2026 | 6:56 AM
Share

Ajit Navale on State Government: आता किसान सभेने शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी एल्गार पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यापर्यंत आंदोलन नेण्याचा निर्धार शेतकरी नेते डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केला. त्यानंतर त्यांना मलबार हिल येथील पोलीस निरीक्षकांकडून नोटीस देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. वर्षावर गेल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा उल्लेख या नोटीसमध्ये आहे. त्यावर डॉ. नवले यांनी संताप व्यक्त केला आहे. आझाद मैदानावर ओरडून ओरडून मरायचं का? असा सवाल त्यांनी केला आहे. दुष्काळग्रस्त शेतकरी श्रमिकांच्या मागण्यांसाठी किसान सभेने अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे राज्यव्यापी महामुक्काम सत्याग्रह सुरू केला आहे. इतर अनेक संघटनांनी त्याला पाठिंबा दिला आहे.

काय गोळ्या घालायच्या घाला

दुष्काळग्रस्त शेतकरी श्रमिकांच्या मागण्यांसाठी अकोले येथे राज्यव्यापी महामुक्काम सत्याग्रह सुरू झाला आहे. त्यावेळी नोटीस आल्यानंतर अजित नवले यांनी संताप व्यक्त केला. वर्षा बंगल्यासमोर आंदोलन करता येत नाही. आझाद मैदानावरील आंदोलनाची दखल घेतली जात नाही. मग काय करायचे? ओरडून ओरडून मरायचे का? काय गोळ्या घालायच्या त्या घाला. आम्ही लोकशाही मार्गाने लढणार असल्याचे नवले म्हणाले.

या मागण्यांसाठी आंदोलनाची हाक

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत करावी. योग्य नुकसान भरपाई करावी

नियमित कर्जफेड करण्याऱ्यांना दोन लाखांचे प्रोत्साहन अनुदान द्यावे

वनजमीन, देवस्थान जमीन, गायरान जमीन नावावर कराव्यात

नमो शेतकरी सन्मान योजनेचे थकीत दोन हप्ते दुष्काळात तातडीने द्यावेत

पिका विमा योजनेतील विविध ट्रिगर लागू करावेत

81 लाख लाडक्या बहिणींना पुन्हा केवायसी प्रक्रियेद्वारे पुन्हा योजनेत समाविष्ट करावे

अकोले येथे सत्याग्रह

अखिल भारतीय किसान सभा, सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स, अखिल भारतीय जनवादी महिला संघटना, डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथे राज्यव्यापी महामुक्काम सत्याग्रहाला सुरुवात करण्यात आली आहे. अकोले तहसील कार्यालयासमोर हा सत्याग्रह सुरू आहे.

आज या सत्याग्रहाला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या वृंदा करात, पॉलिट ब्युरोचे सदस्य डॉ. अशोक ढवळे, माजी आमदार जीवा पांडू गावित, आमदार विनोद निकोले आणि डॉ. अजित नवले यांच्या उपस्थित आज जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास अकोले ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. 26 ऑक्टोबरपर्यंत मुकामुक्काम सत्याग्रह करण्यात येणार आहे.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?