AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अरे देवा! महायुतीत सावळा गोंधळ, एकाच मतदारसंघात युतीचे 2 अधिकृत उमेदवार?

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीत उमेदवार निवडीचा पेच निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने लहू कानडे यांना, तर शिवसेना शिंदे गटाने भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिली आहे. दोघांनीही अर्ज कायम ठेवला आहे. कांबळे यांनी स्वतःला महायुतीचा अधिकृत उमेदवार असल्याचा दावा केला आहे, तर कानडे यांनीही तसाच दावा केला आहे. त्यामुळे महायुतीत मोठा पेच निर्माण झालाय.

अरे देवा! महायुतीत सावळा गोंधळ, एकाच मतदारसंघात युतीचे 2 अधिकृत उमेदवार?
महायुती
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 05, 2024 | 6:03 PM
Share

श्रीरामपूर विधानसभेतील महायुतीतील पेच अद्यापही कायम आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विद्यमान आमदार लहू कानडे यांना तिकीट देण्यात आलं आहे. शिवसेना शिंदे गटाकडून माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांना पक्षाने एबी फॉर्म दिले आहेत. काल दोन्ही उमेदवारांनी आपला अर्ज कायम ठेवला. त्यामुळे महायुतीत सावळा गोंधळ पहायला मिळतोय. यातील कोणी तरी एक उमेदवार अर्ज माघारी घेईल, अशी चर्चा सुरू असताना भाऊसाहेब कांबळे संपर्काबाहेर होते. नॉट रिचेबल असेलेले भाऊसाहेब कांबळे आज माध्यमांसमोर आले. मला पक्षाकडून थांबण्याच्या कोणत्याही सूचना नाहीत. त्यामुळे मीच महायुतीचा अधिकृत उमेदवार असल्याचा दावा कांबळे यांनी केलाय. त्यांनी प्रचाराची सुरूवात देखील केल्याचं सांगताना कांबळे यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचं सांगितलं.

दुसरीकडे काँग्रेसमधून उमेदवारी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केलेले विद्यमान आमदार लहू कानडे यांनी देखील मीच महायुतीचा अधिकृत उमेदवार आहे हे सांगितले. माझ्या प्रवेशाच्या दिवशीच मला एबी फॉर्म दिला होता. वरिष्ठ पातळीवर चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देखील लहू कानडे यांनी दिली. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक यांनी देखील माघारीच्या दिवशी एखाद्या पक्षाचा उमेदवार नॉट रिचेबल होतो यावरून सगळं लक्षात आलं. त्यामुळे पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करेल याची आम्ही वाट पाहत आहोत, असं वक्तव्य केलं.

पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया काय?

दरम्यान, या सगळ्या गोंधळावर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गैरसमजुतीमुळे भाऊसाहेब कांबळे यांचा अर्ज राहिला आहे, असं म्हणटलं. हा सगळा विषय वरिष्ठ पातळीवर गेला आहे. दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते चर्चा करून महायुतीचा उमेदवार कोण? याचा आज संध्याकाळपर्यंत निर्णय घेतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

नेवासा मतदारसंघातही असंच काहीसं घडलेलं?

दरम्यान, नेवासा मतदारसंघात देखील अजित पवार गट आणि शिंदे शिवसेना गट या दोन्ही पक्षांच्या उमेदावारांना एबी फॉर्म देण्यात आले होते. मात्र अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराने माघार घेत त्या ठिकाणी महायुतीला समर्थन दिलं. श्रीरामपूर मतदारसंघात मात्र महाविकास आघाडीच्या उमेदवारासमोर महायुतीचेच दोन्ही उमेदवार एकमेकांसमोर उभे राहिल्याने महायुतीचा अधिकृत उमेदवार कोण? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Follow Us
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई
खासगी रुग्णालयांतील सलाईन नळीच्या विक्रीत... FDA आयुक्तांची धडक कारवाई पुन्हा राज्यभर चर्चेत
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?