Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : धमक असेल तर VSR ला कुलूप लावून दाखवा – रोहित पवारांचं ओपन चॅलेंज

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाती निधनानंतर रोहित पवारांनी घातपाताचा गंभीर आरोप केला आहे. व्हीएसआर कंपनीला वाचवण्याचा सत्ताधाऱ्यांवर आरोप करत, त्यांनी या प्रकरणाच्या आंतरराष्ट्रीय चौकशीची मागणी केली. ब्लॅक बॉक्स आणि इंधनाच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, पारदर्शक तपासाची गरज रोहित पवारांनी आज पुन्हा अधोरेखित केली.

Rohit Pawar on Ajit Pawar Plane Crash : धमक असेल तर VSR ला कुलूप लावून दाखवा - रोहित पवारांचं ओपन  चॅलेंज
रोहित पवारांनी दिलं चॅलेंज
Image Credit source: social media
| Updated on: Feb 18, 2026 | 2:18 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं विमान बारामतीजवळ कोसळलं आणि 28 जानेवारीला त्यांचा मृत्यू झाला. अजित दादांच्या जाण्याने अख्खा महाराष्ट्र सुन्न झाला, कोणाचाच या बातमीवर विश्वास बसत नव्हता. दुसऱ्या दिवशी 29 जानेवारीला शोकाकूल वातावरणात बारामती येथे अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. पवार कुटुंब दु:खाच्या छायेत बुडालं. मात्र या घटनेनंतर काही दिवसांनी या अपघाताबद्दल विविध शंका उपस्थित होऊ लागल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार, आणि अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी तर हा अपघात नसून घातपात असल्याच थेट आरोप केला. त्याबद्दल त्यांनी वेळोवेळी पत्रकार परिषदा घेतकल्या, पुरावेही सादर केले. एवढेच नव्हे तर या घटनेच्या तपासासाठी त्यांनी खाजगी गुप्तहेर संस्थांची मदत घेतल्याचे वृत्तही समोर आले.

मात्र सरकारकडून या घटनेचा नीट तपास होतोय का यावरही त्यांनी नाराजी दर्शवत असमाधान व्यक्त केलं आहे. आज मुंबईतील वाय बी. चव्हाण सभागृहात रोगित पवार यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेत या अपघाताशी संबंधित अनेक शक्यतांबाबत गौप्यस्फोट केले.

कंपनीला वाचवलं जातंय 

तपास यंत्रणांनी तपास सुरू केला आहे, पण त्याचा वेग कमी आहे असे ते म्हणाले. ब्लॅक बॉक्स, फ्युएल टँक याबददलही त्यांनी अनेक प्रश्न उप्स्थित केलेत. तसेच सत्तेतील लोकांकडे बोच दाखवतत काही लोकं व्हीएसआर कंपनीला वाचवायचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. व्हिएसआर कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. सत्तेतील लोक मुद्दाम मालकाला वाचवत आहेत असा आरोप त्यांनी केला. दादा गेले त्याचं काही नाही. पण पैसा वाचला पाहिजे. मैत्री टिकली पाहिजे म्हणून या कंपनीला मदत केली जात आहे. या कंपनीला आज ना उद्या बंदी घातली पाहिजे असंही रोहित पवार म्हणाले.

व्हीएसारला पाठबळ दिलं जातंय

या संपूर्ण अपघाताची चौकशी झाली पाहिजे. सीबीआयला चौकशी दिली, सीआयडी घेतलीच आहे, ते ठीक आहे. चांगली गोष्ट आहे. डीजीसीए आहे, त्यांची इंटर्नल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सी आहे, हरकत नाही. पण भारताच्या बाहेरच्या 2 एजन्सी घेतल्या पाहिजेत,आणि त्या सर्व एजन्सीना रिपोर्ट करण्यासाठी एक मॉनिटरिंग एजन्सी असावी. रिपोर्टिंगसाठी एक कमिटी फॉर्म करा अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

दुर्देवाने महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता नाही. देशातील विरोधी पक्षाचा नेता घ्या. माजी अधिकारी, माजी जजेस तुम्ही घ्या. काही चांगले तज्ज्ञ घ्या, या कमिटीला रिपोर्ट सादर केला पाहिजे. कमिटीच्या मनात जे प्रश्न आहेत, ते एजन्सीला विचारण्याची संधी दिली गेली पाहिजे. पारदर्शक तपास व्हावा अशी मागणी आहे, मात्र आज ते होताना दिसत नाही. व्हीएसारला पाठबळ दिलं जातंय असा आरोप त्यांनी केला.

धमक असेल तर कंपनीला कुलूप लावून दाखवा

जरल खरंच तुमच्याकडे सत्ता आहे ना, त्या सत्तेचा वापर करून व्हीएसआरला आत्ताच्या आत्ता कुलूप लावण्याची धमक दाखवा असं थेट चॅलेंज रोहित पवार यांनी दिलं. आज अजित दादा असते आणि आज त्यांच्या कुटु्ंबात, राष्ट्रवादी परिवारत जर अशी घटना घडली असती तर दादा थेट म्हणाले असते की राजकारण बाजूला, आत्ताच्या आत्ता व्हीएसआर बंद करा, ही दादांची धमक होती. ही धमक मात्र आज सत्तेत असलेल्या लोकांकडून दिसावी अशी लोकांची आणि आमची अपेक्षा आहे, असंही रोहित पवार म्हणाले.