फोडलेले नारळ, लिंबू अन् हळद-कुंकू; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा, फोटो समोर

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानाबाहेर अघोरी पूजेचे साहित्य आढळल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या धामधुमीत हा प्रकार घडल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.

फोडलेले नारळ, लिंबू अन् हळद-कुंकू; उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानाबाहेर अघोरी पूजा, फोटो समोर
ajit pawar home 1
| Updated on: Nov 18, 2025 | 2:10 PM

राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींसाठी निवडणूक होणार आहे. तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहेत. यामुळे सध्या राज्यातील वातावरण तापले आहे. त्यातच आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतील सहयोग निवासस्थानाबाहेर एक खळबळजनक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांच्या सहयोग निवासस्थानासमोर अघोरी पूजेचे साहित्य आढळून आले आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.

नेमकं काय घडलं?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती येथील सहयोग निवासस्थानासमोर अघोरी पूजा किंवा भानामतीचे संकेत देणारे साहित्य आढळून आले आहे. आज सकाळी (१८ नोव्हेंबर २०२५) बारामती येथील अजित पवार यांच्या मालकीच्या ‘सहयोग’ सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ हा प्रकार पाहायला मिळाला. यावेळी मुख्य प्रवेशद्वाराजवळ भानामती केल्याचे स्पष्ट संकेत देणाऱ्या अघोरी पूजेचे साहित्य आढळले. यामध्ये नारळ, लिंबू, कुंकू किंवा अन्य संशयास्पद वस्तू असल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या धक्कादायक प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार घडल्याने जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुन राजकीय विरोधकांनी अघोरी प्रकारावरुन सवाल उपस्थित केले आहेत. अजित पवारांच्या घरासमोर अशा प्रकारचे संशयास्पद साहित्य सापडल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे. स्थानिक प्रशासनाने या घटनेची तात्काळ दखल घेतली असून, हा प्रकार कोणी आणि कोणत्या हेतूने केला, याचा सखोल तपास सुरू केला आहे.

हा प्रकार केवळ अंधश्रद्धा किंवा स्थानिक वादातून झाला आहे का? त्यामागे कोणते मोठे राजकीय षडयंत्र आहे का? याबद्दल अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र, सध्याच्या निवडणुकांच्या धामधुमीत या घटनेमुळे बारामतीकर हादरले आहेत.