Ajit Pawar funeral LIVE : राज ठाकरे, शर्मिला ठाकरे काटेवाडीत दाखल

Maharashtra Deputy CM Ajit Pawar funeral LIVE Updates in Marathi : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल मोठा विमान अपघात झाला. आज अजित बारामतीमध्ये 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.

Ajit Pawar funeral LIVE : राज ठाकरे, शर्मिला ठाकरे काटेवाडीत दाखल
Ajit Pawar funeral
| Updated on: Jan 29, 2026 | 9:40 AM

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Jan 2026 09:40 AM (IST)

    शरद पवार विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात उपस्थित

    अजित पवार यांच्या विमानाचा काल मोठा अपघात झाला. या अपघातात अजित पवार जखमी झाल्याचे सुरूवातीला माहिती होती. त्यानंतर थेट त्यांच्या निधनाची बातमी आली. आज बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

  • 29 Jan 2026 09:38 AM (IST)

    अजित पवार यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्यांची गर्दी

    अजित पवार यांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी कार्यकर्यांची मोठी बघायला मिळत आहे. अनेक मोठे नेतेही काटेवाडीत पोहोचले आहेत.

  • 29 Jan 2026 09:34 AM (IST)

    नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे बारामतीकडे रवाना

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री पंकजा मुंडे, पुणे विमानतळावरून बारामतीकडे रवाना झाले आहेत. काल चंद्रशेखर बावनकुळे आणि पंकजा मुंडे बारामतीमध्ये पोहोचले होते.

  • 29 Jan 2026 09:31 AM (IST)

    धीरज देशमुख आणि रितेश देशमुख काटेवाडीत

    धीरज देशमुख आणि रितेश देशमुख बारामतीच्या काटेवाडीत पोहोचले आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी हे पोहोचले आहेत.

  • 29 Jan 2026 09:27 AM (IST)

    राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे काटेवाडीत…

    राज ठाकरे, शर्मिला ठाकरे आणि अमित ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांसह अजित पवार यांचे मुळगाव काटेवाडी येथे अंत्यदर्शनासाठी पोहोचले आहेत.

  • 29 Jan 2026 09:25 AM (IST)

    राज ठाकरे अमित ठाकरेंसह बारामतीत दाखल

    राज ठाकरे अमित ठाकरेंसोबत बारामतीत दाखल झाले आहेत. यावेळी मनसेचे काही कार्यकर्त्येही उपस्थित होते.

  • 29 Jan 2026 09:23 AM (IST)

    शरद पवार पोहोचले विद्या प्रतिष्ठान येथे

    11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यापूर्वी बारामतीमधील विद्या प्रतिष्ठान येथे लोक मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. शरद पवार देखील विद्या प्रतिष्ठान येथे पोहोचले आहेत.

  • 29 Jan 2026 09:17 AM (IST)

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बारामतीकडे रवाना

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामतीकडे रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्या अपघातानंतर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे बारामतीकडे गेले होते.

  • 29 Jan 2026 09:13 AM (IST)

    अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीत…

    अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीत ठेवण्यात आलंय. यावेळी जवळपास पवार कुटुंबातील सदस्य उपस्थित आहेत.

  • 29 Jan 2026 09:00 AM (IST)

    अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण करू नका- शरद पवार

    अजित पवार काल मुंबईहून बारामतीला निघाले असताना त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला. हा अपघात इतका भयानक होता की, विमानातील सर्वांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर बोलताना शरद पवार यांनी म्हटले की, अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण करू नका.

  • 29 Jan 2026 08:55 AM (IST)

    शरद पवार काटेवाडीकडे रवाना..

    अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी काटेवाडी येथे ठेवण्यात आले. पवार कुटुंबिय तिथे पोहोचले असून आता बारामतीहून शरद पवार काटेवाडीकडे रवाना झाले.

  • 29 Jan 2026 08:42 AM (IST)

    सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांसोबत संवाद

    काटेवाडी येथे लोक मोठ्या संख्येने अजित पवार यांच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्याकडून कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला जात आहे.

  • 29 Jan 2026 08:35 AM (IST)

    काटेवाडीमध्ये ग्रामस्थांची मोठी गर्दी, रोहित पवारांकडून ग्रामस्थांसोबत संवाद

    काटेवाडीमध्ये अजित पवार यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली. रोहित पवार लोकांना समजून सांगताना दिसत आहेत.

  • 29 Jan 2026 08:22 AM (IST)

    रांगेत उभा राहून काटेवाडीचे ग्रामस्थ घेत आहेत अजित पवारांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन

    काटेवाडी येथे अजित पवार यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात आलंय. यावेळी काटेवाडीच्या ग्रामस्थांना अंतिम दर्शनासाठी पाठवण्यात आले. रोहित पवार स्वत: गेटजवळ थांबले आहेत. महिलांना अगोदर सोडण्यात आलंय.

  • 29 Jan 2026 08:17 AM (IST)

    संपूर्ण पवार कुटुंबिय काटेवाडीत दाखल..

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती विमानतळाच्या जवळ मोठा विमान अपघात झाला. या विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाले. काटेवाडी हे पवारांचे मुळगाव असून येथे अजित पवारांचे पार्थिव पोहोचले आहे, संपूर्ण पवार कुटुंबिय काटेवाडीत दाखल झाले.

  • 29 Jan 2026 08:12 AM (IST)

    अजित पवार यांना आज बारामतीत अखेरचा निरोप…

    अजित पवार यांना बारामतीत आज अखेरचा निरोप दिला जाईल. अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी काटेवाडी येथे आणले गेले.

  • 29 Jan 2026 08:07 AM (IST)

    11 वाजता बारामतीच्या विद्या प्रतिष्ठाणच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

    विद्या प्रतिष्ठाणच्या प्रांगणात अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तिथे लोकांनी मोठी गर्दी केली अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी पोहोचले आहे. तिथे त्यांचे नातेवाईक जमले आहेत.

  • 29 Jan 2026 08:00 AM (IST)

    अजित पवार यांच्या विमान अपघाताची माहिती सर्वात अगोदर माझ्याकडे- राजेश टोपे

    अजित पवार यांच्या विमान अपघाताची बातमी सर्वात अगोदर माझ्याकडे होती, ङे राजेश टोपे यांनी म्हटले. राजेश टोपे यांनी म्हटले की, आमच्या जिल्ह्यातील एक मुलगा बारामती विमानतळावर स्टोअर रुममध्ये कामाला आहे. त्याने मला सकाळी फोन करुन सांगितले अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला आहे. फक्त विमानाचे शेवटचे टोक दिसत आहे बाकी सर्व विमान जळून गेले.

  • 29 Jan 2026 07:56 AM (IST)

    दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय बारामतीत…

    अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय बारामतीत पोहोचला आहे. विद्या प्रतिष्ठाणच्या मैदानात अजित पवार यांच्या पार्थिवाव अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

  • 29 Jan 2026 07:53 AM (IST)

    खासदार सुनेत्रा पवार काटेवाडीत दाखल

    खासदार सुनेत्रा पवार काटेवाडीमध्ये दाखल झाल्या असून काही वेळात अजित पवार यांचे पार्थिव काटेवाडीमध्ये पोहचेल.

  • 29 Jan 2026 07:52 AM (IST)

    दादांना अखेरचा निरोप, काटेवाडीत मोठी गर्दी

    अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी काटेवाडीकडे रवाना झाले असून त्यांच्या घराबाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

  • 29 Jan 2026 07:50 AM (IST)

    अजित पवार यांच्या काटेवाडीच्या घरी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

    पार्थ पवार वडिलांच्या पार्थिवाच्या शेजारी बसून. बारामतीच्या मेडिकल कॉलेजवरून अजित पवारांचे पार्थिव त्यांच्या मुळगावी नेले जात आहे. काटेवाडीमध्ये लोक समजले असून पवार कुटुंबिय काटेवाडीमध्ये दाखल झाले आहेत.

  • 29 Jan 2026 07:44 AM (IST)

    अजूनही विश्वास बसत नाही… सुप्रिया सुळे यांचे स्टेट्स..

    अजित पवार यांच्या निधनानंतर सुप्रिया सुळे यांनी व्हॉटसअपवर स्टेट्स ठेवत म्हटले की, अजूनही विश्वास बसत नाही..

  • 29 Jan 2026 07:42 AM (IST)

    अजित पवारांचे पार्थिव काटेवाडीच्या दिशेने निघाले, मुलगा पार्थ पवारसोबत

    अजित पवार यांचे पार्थिव आता काटेवाडीकडे निघाले असून तिथे कुटुंबातील सदस्य पोहोचले आहेत. तिथे काही वेळ अजित पवार यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल.

  • 29 Jan 2026 07:32 AM (IST)

    सुनेत्रा पवार काटेवाडीकडे निघाल्या, कुटुंबातील सदस्यही दाखल..

    राज्यसभा खासदार आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार ह्या सहयोग बंगलेयातून गाडीतून निघाल्या आहेत. काल अजित पवार यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर दिल्लीहून सुनेत्रा पवार बारामतीत दाखल झाल्या.

  • 29 Jan 2026 07:25 AM (IST)

    एका विमान अपघातात राजकारणातील दादा माणूस हरपला..

    उपमुख्यमंत्री अजित पवार काल सकाळी 8.10 वाजता मुंबईहून विमानाने बारामतीकडे निघाले होते. मात्र, धावपट्टीच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा मोठा अपघात झाला आणि त्यांचे निधन झाले. राजकारणातील दादा माणूस हरपल्याची भावना लोकांमध्ये आहे.

  • 29 Jan 2026 07:21 AM (IST)

    सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार काटेवाडीच्या घरी दाखल, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

    थोड्याच वेळात अजित पवार यांचे पार्थिव त्यांच्या काटेवाडीच्या घरी आणले जाईल. पवार कुटुंबिय अजित पवार यांच्या काटेवाडीच्या घरी पोहोचत आहेत. अंतिम दर्शनासाठी अजित पवार यांचे पार्थिव शरीर तेथे ठेवले जाईल.

  • 29 Jan 2026 07:18 AM (IST)

    सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांना श्रद्धाजंली

    काल रात्री उशिरा उद्धव ठाकरे अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या भेटीसाठी पोहोचले होते. सामनाच्या अग्रलेखातून अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

  • 29 Jan 2026 07:12 AM (IST)

    अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण करू नका- शरद पवार

    अजित पवार यांच्या मृत्यूचे राजकारण करू नका, तो अपघात आहे, असे नुकताच मोठे विधान शरद पवार यांनी केले आहे.

  • 29 Jan 2026 07:09 AM (IST)

    अमित शहा बारामतीत अंत्यसंस्काराला येणार, नरेंद्र मोदींचा शरद पवार यांना फोन

    राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर अमित शहा यांनी आज बारामतीत अंत्यदर्शनासाठी येतील. शरद पवार यांना नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता. दोघांमध्ये काही काळ चर्चा झाल्याची माहिती मिळतंय.

  • 29 Jan 2026 06:58 AM (IST)

    अजित पवार यांच्या पार्थिवावर 11 वाजता अंत्यसंस्कार

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल बारामतीमध्ये अपघाती मृत्यू झाला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. आज अजित पवार यांच्या पार्थिवावर 11 वाजा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार केले जातील.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा काल मुंबईहून बारामतीला जात असताना विमान अपघात झाला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितींच्या निवडणुकीसाठी अजित पवार यांची बारामतीमध्ये सभा होती. मात्र, अगदी धावपट्टीच्या जवळ विमान अपघात झाला. ज्यावेळी विमान कोसळले, त्यावेळी मोठा धमाका झाला. विमानात असलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला. सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार या अपघातात गंभीर जखमी आहेत, त्यानंतर काही वेळातच बातमी आली अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर मोठा धक्का राज्याला बसला. आज 11 वाजता अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील. अमित शहा अजित पवारांच्या अत्यंसंस्कारासाठी बारामतीत येणार आहेत. अजित पवार यांचे लाखो कार्यकर्ते कालपासून बारामतीत आहेत. हॉस्पिटलबाहेर लोकांचा एकच मोठा आक्रोश बघायला मिळाला. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर शरद पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्राचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे.