अजित पवार यांनी लगेच चूक सुधारली; भाषणात बोलताना काय झाली होती चूक?

| Updated on: Jan 20, 2023 | 10:57 PM

अनिल देशमुख म्हणायचं होतं. आपल्याला जे पटते ते बोलून टाकतो, असंही अजित पवार म्हणाले. पण, कुणी माफी मागा म्हटलं तर माफी मागायला मी मोकळा नाही, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं.

अजित पवार यांनी लगेच चूक सुधारली; भाषणात बोलताना काय झाली होती चूक?
अजित पवार
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

सांगली : येथे कार्यक्रमात बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, महाराष्ट्राची संस्कृती आहे. काही लोकं गोबेल्स नीती वापरतात आणि एखाद्याची बदनामी करतात. चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करतात. तुम्ही बघीतलं, अनिल बाबर यांच्याबद्दल १०० कोटींचा आरोप झाला. नंतर ज्यांनी आरोप केला ते म्हणाले माझ्याकडं काही पुरावा नाही. पण, त्यांच्या आयुष्यातले काही वर्षे वाया घालविले. कोण भरून देणार आहे, असा सवाल अजित पवार यांनी विचारला.

संजय राऊत यांना आतमध्ये टाकलं. नंतर म्हटलं यांच्याबद्दलचे पुरावेच नाहीत. हे जे काही चाललं ते बरोबर नाही. वैभव नाईक इस्लामपूरला भेटले होते. उद्धव ठाकरे गटाचे ते सिंधुदुर्गचे आमदार आहेत. विदर्भातले आमदार नितीन देशमुख.

एवढ्यात अजित पवार यांच्या लक्षात एक चूक आली. आपण बोलण्याच्या ओघात अनिल देशमुख ऐवजी अनिल बाबर बोललो. बोलण्याच्या ओघात ही चूक झाली. असं त्यांनी भर सभेतचं सांगितलं.

अजित पवार यांनी आपल्या स्टॉपला सांगितलं की, चुकून एखादं नाव गेलं तर लगेच करेक्शन करा. नाहीतर पुन्हा ब्रेकिंग न्यूज अजित पवार हे अनिल देशमुखांच्या ऐवजी अनिल बाबर म्हंटलं. असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी लगेच दिलं.

बाबर हा शब्द मागे घेतो. अनिल देशमुख म्हणायचं होतं. आपल्याला जे पटते ते बोलून टाकतो, असंही अजित पवार म्हणाले. पण, कुणी माफी मागा म्हटलं तर माफी मागायला मी मोकळा नाही, असंही अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं. स्वराज्य रक्षकचं. त्यात सर्व येतं. याचा पुनरुच्चारही अजित पवार यांनी केला.