Maharashtra Budget 2022: लता मंगेशकर संगीत स्मारकाची घोषणा, मुंबईतल्या जागाही निश्चित; अजित पवारांची घोषणा

| Updated on: Mar 11, 2022 | 3:13 PM

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पातून त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडली आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी आरोग्य आणि कृषी क्षेत्रावर अधिक भर दिला आहे.

Maharashtra Budget 2022: लता मंगेशकर संगीत स्मारकाची घोषणा, मुंबईतल्या जागाही निश्चित; अजित पवारांची घोषणा
अर्थसंकल्पीय अधिवेशनात बजेट सादर करताना अजित पवारांची घोषणा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

मुंबई: राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी 2022-23 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प (Budget 2022-23) मांडला. या अर्थसंकल्पातून त्यांनी विकासाची पंचसूत्री मांडली आहे. या अर्थसंकल्पात अजित पवार यांनी आरोग्य आणि कृषी क्षेत्रावर अधिक भर दिला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागावर सर्वाधिक भर देण्यात आला आहे. तसेच अजित पवार यांनी स्वर्गीय लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांच्या नावाने संगीत स्मारक स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा केली. मुंबईत कलिनी विद्यापीठाच्या परिसरात लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय आणि संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्यासाटी 100 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. तसेच थोर समाजसुधारकांच्या नावाने विद्यापीठात अध्यासने सुरू करण्याचं धोरण सरकारने आधीच सुरू केलं आहे. त्यासाठी तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार यांनी तिसरा अर्थसंकल्प मांडला. राज्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र हे एक ट्रिलियन डॉलर असलेलं राज्य ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषीच्यापायाभूत सुविधासाठी भरीव तरतूद करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

नियमित कर्ज फेडणाऱ्यांना अनुदान

नियमित पीक कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये अनुदान देणार असल्याचं जाहीर केलं होतं. नवीन आर्थिक वर्षात नियमित कर्ज फेडणाऱ्यांना 50 हजाराचं अनुदान देण्यात येईल. त्यामुळे त्याचा 20 लाख शेतकऱ्यांना फायदा होईल. त्यामुळे सरकारवर 10 लाख कोटीचा खर्च येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

पीक योजनेत दुरुस्ती हवी

गुजरात अन्य काही राज्य पंतप्रधान पीक विमा योजनेतून बाहेर पडली आहे. आम्ही या योजनेत बदल करण्याची केंद्राला विनंती केली आहे. आम्ही पीक योजनेसाठी अन्य पर्यायाचं विचार करणार आहोत. शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने कर्ज देण्याचे सांगितले होते. त्यानुसार वाटप झाले आहे आहे, असंही त्यांनी सांगितलं.

अजित पवारांच्या घोषणा

  1. आरोग्य सेवांसाठी अर्थसंकल्पात 11 हजार कोटींच्या निधीची तरतूद
  2. मुंबईतील बैलघोडा पशूवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयाचा निधी
  3. कृषी विभागाच्या योजनांमध्ये तीन टक्के निधी यापुढे आजी-माजी सैनिकांना उपलब्ध करून देणार
  4. मुख्यमंत्री शाश्वत निधी योजना, शेततळ्यासाठी अनुदानात 75 हजारापर्यंत वाढ
  5. विदर्भ आणि मराठवाड्यात कापूस आणि सोयाबीन, विशेष कृती योजनेसाठी 1000 कोटींचा निधी
  6. जलसंपदा विभागासाठी 13 हजार 252 कोटींची घोषणा
  7. महिला शेतकऱ्यांना आर्थिक अनुदान देणार
  8. हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार
  9. शेतकरी कल्याणासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद; अजित पवारांची घोषणा
  10. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, दळणवळण आणि तंत्रज्ञान विकासाची पंचसुत्री
  11. छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद
  12. तरुणांना स्टार्टटपसाठी भांडवल देणार. 100 कोटी रुपये रकमेचा स्टार्टअप फंड उभारण्यात येणार आहे.
  13. कौशल्य रोजगार विभागाला 615 कोटी देणार

संबंधित बातम्या:

Maharashtra Budget 2022 LIVE Updates : महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य :अजित पवार

अर्थमंत्री, मुख्यमंत्री विधानभवनात दाखल, थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर होणार

अरे या या या… गुलाबराव, अबू आझमी, सत्तारांना बोलावलं, महाजनांंनी ‘विजयाचा’ पेढा भरवला