
Ajit Pawar plane crash: बुधवारी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात महाराष्ट्रचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आले, ज्यामुळे मन सुन्न झालं. एका व्हिडीओमध्ये असं देखील दिसत होतं की, लँडिंगच्या दुसऱ्या प्रयत्नात विमानाच्या उजव्या बाजूचा पंखा अचानक खालच्या बाजूला सरकला आणि विमान एका बाजून तिरका झाला… त्यानंतर त्याचं रुपांतर आगीच्या गोळ्यात झालं. विमान खाली कोसळल्यानंचर चार ते पाच स्फोट झाले आणि याच स्फोटात होत्याचं नव्हतं झालं… तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दृश्य तीन भयानक परिस्थितीच्या दिशेने इशारा करत आहेत.
एरोडायनामिक स्टॉल – व्हिडीओमध्ये विमान ज्या प्रकारे एका बाजूने खाली वळताना दिसत आहे. ते ‘असममित एरोडायनामिक स्टॉल’ (Asymmetric Aerodynamic Stall) च्या दिशेने संकेत असू शकतात. जेव्हा विमानाची गती मोठ्या प्रमाणात कमी होते, तेव्हा विमानाचे पंख हवेतून जाणं बंद करतात आणि लिफ्ट बंद होते. लियरजेट 45 सारख्या विमानांचं इंजिन शेपटीच्या भागाकडे असते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, गतीवर वळण घेत असताना एका पंख्याने लिफ्ट गमावली असेल, ज्यामुळे विमान अनियंत्रित झालं आलं आणि अपघात झाला.
इंजिल फेल होणं – दुसरी थिअरी म्हणजे, लँडिंगच्या पूर्वी विमानाच्या इंजिनने काम करणं बंद केलं असेल. एविएशन एक्सपर्ट मार्क मार्टिन यांच्यानुसार, जेव्हा एक इंजिन फेल होतं, तेव्हा दुसरं इंजिनची पूर्ण शक्ती विमानाला एका बाजूने ओढून घेते. ज्यामुळे विमानाचं नियंत्रण सुटतं आणि पटली होतं… मात्र लँडिंग क्लीयरेंस आणि क्रॅशच्या मध्ये 60 सेकेंडमध्ये पायलटकडून कोणताच ‘मेडे’ कॉल रिकॉर्ड झाला नाही. जो या थिअरीवर प्रश्न उपस्थित करु शकेल.
अखेरच्या क्षणी तिव्र वेग – तिसरी थिअरी असं सांगते की, वातावरण आणि सूर्याच्या किरणांमुळे पायलटला धावपट्टी दिसायला फार उशीर झाला… विमान धावपट्टीशी जुळवण्यासाठी शेवटच्या क्षणी घेतलेला एक तीव्र वळण कदाचित घातक ठरला असेल. असं देखील सांगण्यात येत आहे.
घडलेल्या धक्कादायक घटनेनंतर, बारामती विमानतळ येथील पायाभूत सुविधांवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. विमानतळावर पायलट करेक्ट अल्टिट्यूड टेक्नॉलॉजी (PAPI) आणि ILS (इंस्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम) सारख्या मूलभूत सुविधांचा अभाव होता. त्या दिवशी दृश्यमानता फक्त 800 ते 3,000 मीटर दरम्यान होती, जी सुरक्षित लँडिंगसाठी खूप कमी मानली जात होती.
ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर) च्या सुरुवातीच्या विश्लेषणातून असं दिसून आलं की, विमान जमिनीवर आदळण्यापूर्वी कॉकपिटमधून ऐकू आलेले शेवटचे शब्द “अरे शिट” असे होते. यावरून असं सिद्ध होतं की, पायलटला अचानक काही मोठी समस्या जाणवली पण तेव्हा फार उशिर झालेला होता.