AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 दिवसांनंतर मिळाला राज्याला पहिला महापौर, अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या खेडकर; काँग्रेस, वंचित, ठाकरेंना मोठा झटका

महानगरपालिकांच्या निकालाच्या 15 दिवसांनंतर अखेर राज्याला पहिला महापौर भेटला आहे. अकोला महानगरपालिकेत भाजपने बाजी मारली असून काँग्रेस, वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा झटका मिळाला आहे.

15 दिवसांनंतर मिळाला राज्याला पहिला महापौर, अकोल्याच्या महापौरपदी भाजपच्या खेडकर; काँग्रेस, वंचित, ठाकरेंना मोठा झटका
शारदा खेडकरImage Credit source: Tv9
| Updated on: Jan 30, 2026 | 12:18 PM
Share

अकोल्यात भाजपच्या शारदा खेडकर यांची महापौरपदी निवड झाली आहे. अकोला महानगरपालिकेत भाजप सत्तास्थापन करणार आहे. शारदा खेडकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार सुरेखा काळे यांचा पराभव केला होता. शारदा खेडकर यांना 45 मतं मिळाली आहेत. अकोला महानगरपालिकेत भाजपने काँग्रेस, वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेला धोबीपछाड दिली आहे. भाजपविरोधात आम्ही सारे असा प्रयोग ऐन भरात असताना आता भाजपने डावच पलटला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचितसह इतर पक्षांनी भाजपविरोधात प्रयोगाची चाचपणी केली होती. परंतु संख्याबळाच्या जोरावर भाजपने बाजी मारली असून अकोला महानगरपालिकेत इतर पक्षांची डाळच शिजली नाही.

अकोला महानगरपालिकेत एकूण 80 जागा आहेत. बहुमतासाठी 41 जागांची आवश्यकता आहे. भाजपकडे 38 जागांचं बहुमत होतं. तर काँग्रेसकडे 21 नगरसेवक होते. 41 जागांसाठी भाजपला फक्त तीन जागा हव्या होत्या. भाजपच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या शहर सुधार आघाडीने बहुमताचं गणित जुळवल्याने महापौर आणि उपमहापौर या दोन्ही पदांवर याच आघाडीचा उमेदवार विराजमन होणार, हे जवळपास निश्चित झालं होतं.

दुसरीकडे महाविकास आघाडीकडूनही सत्ता आमचीच येणार, असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात येत होता. आमच्याकडे संख्याबळ असून 41 च्या वर दोन नगरसेवक आमच्यासोबत असल्याचा दावा काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी गुरुवारी केला होता. त्यामुळे अकोल्यात महापौरपदाची बाजी नेमकी कोण मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर याचा अंतिम फैसला आज मतदानातूनच स्पष्ट झाला असून भाजपने सर्वांनाच मात दिली आहे. राज्यातील महापालिका निवडणुकांचा निकाल 16 जानेवारी रोजी लागला होता. त्याच्या 15 दिवसांनंतर आता राज्याला पहिला महापौर मिळाला आहे.

भाजपविरोधात महापालिकेत मोट बांधण्याचा प्रयत्न वंचितने केला. पण संख्याबळाचा आकडा जमविण्यात मोठी अडचण होती. कारण वंचितचे 5, एमआयएमचे 3, अपक्ष 2, दोन्ही राष्ट्रवादींचे 4, काँग्रेस 21 असा मेळ जमवूही 41 हा बहुमताचा आकडा जमविणं अवघड होतं. त्यातच नगरसेवक पळवापळवचीही भीती होती. गेल्या एका आठवड्यापासून शहर महापालिकेसाठीचा हायहोल्टेज ड्रामा आता संपुष्टात आला आहे. भाजपविरोधात सर्वच पक्ष मोठा खेला करतील असे वाटत असतानाच भाजपने डाव टाकला आहे.

अकोल्यातील पक्षीय बलाबल

एकूण जागा- 80 बहुमताचा आकडा- 41 भाजप- 38 काँग्रेस- 21 उबाठा- 6 शिंदे सेना- 1 अजित पवार राष्ट्रवादी- 1 शरद पवार राष्ट्रवादी- 3 वंचित- 5 एमआयएम- 3 अपक्ष- 2

अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू
अजित पवार यांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी सुरू.
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया
दोन्ही राष्ट्रवादींच्या एकीकरणावर जयंत पाटलांची मोठी प्रतिक्रिया.
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील; नरहरी झिरवाळ यांचा विश्वास.
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर
दादांच्या उत्तराधिकारी सुनेत्रा पवारच?उपमुख्यमंत्रीपदासाठी नाव आघाडीवर.
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली
अवकाळी पावसाचा थयथयाट... वारा एवढा सुटला की पपईची गाडीच उलटली.
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?
विलीनीकरण करुन अजित पवार यांची इच्छा पूर्ण करणार?.
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?
विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू नये म्हणून सरकारचा डाव?.
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?
शेवटच्याक्षणी पायलटने प्रतिसाद का दिला नाही? विमानात नेमकं काय घडलं?.
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?
पवार घराण्यातून नेतृत्व कुणाकडे? राजकीय वारसा कोण चालवणार?.
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!
जीवश्य कंठश्य मित्र...; फडणवीसांनी लिहिला भावनिक लेख!.