अजित पवार- छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर, मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचे लागले बॅनर

मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज झाले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यात याआधी भुजबळ कुठल्या ना कुठल्या कारणाने ते उपस्थित राहिले नाही.

अजित पवार- छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर, मंत्रिमंडळात स्थान मिळण्याचे लागले बॅनर
अजित पवार-छगन भुजबळ
Image Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 20, 2025 | 9:37 AM

NCP Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि पक्षातील ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यात बेबनाव असल्याची चर्चा आहे. भुजबळ यांना राज्याच्या महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. त्यामुळे ओबीसी नेते असलेले छगन भुजबळ नाराज आहेत. त्यांनी जाहीरपणे आपली नाराजी अनेकदा व्यक्त केली आहे. आता रविवारी अजित पवार नाशिक जिल्हा दौऱ्यावर आहे. या दौऱ्यानिमित्त छगन भुजबळ आणि अजित पवार नाशिकमध्ये प्रथमच एकाच व्यासपीठावर येणार आहे. त्यामुळे भुजबळ समर्थकांनी मंत्रिमंडळात सन्मानाने स्थान मिळावे, या आशयाचे बॅनर राष्ट्रवादी कार्यालयासमोर लावले आहे.

प्रथमच दोन्ही नेते एका व्यासपीठावर

नाशिकमध्ये पहिल्यांदाच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि छगन भुजबळ एकाच व्यासपीठावर येणार आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्थापनेनंतर नाशिकमध्ये पहिल्यांदाच हे दोन नेते एकाच व्यासपीठावर येत आहे. मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज झाले होते. त्यामुळे अजित पवार यांच्या नाशिक दौऱ्यात याआधी भुजबळ कुठल्या ना कुठल्या कारणाने ते उपस्थित राहिले नाही. आता नाशिकच्या राष्ट्रवादी कार्यालयात होणाऱ्या कार्यकर्त्या मेळाव्याला अजित पवार आणि छगन भुजबळ एकत्र येत आहे. त्यावेळी अजित पवार यांच्यासमोर भुजबळ समर्थक आपली नाराजी दाखवणार आहे.

अजित पवार काय बोलणार?

मेळाव्यापूर्वी अजित पवार आणि छगन भुजबळ नाशिकमध्ये एका हॉटेलच्या उद्घाटनाला एकत्र येणार आहे. अजित पवार यांचा दौऱ्यामुळे नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात सन्मानाने स्थान मिळावे, यासाठी राष्ट्रवादी कार्यालयासमोर बॅनर लावण्यात आले आहे. त्यामुळे आजच्या राष्ट्रवादी कार्यालयात होणाऱ्या मेळाव्यात अजितदादा काय बोलणार? याकडे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांनी आतापर्यंत छगन भुजबळ यांच्या नाराजीची दखल घेतली नाही. भुजबळ यांनी वारंवार वक्तव्य करुनही अजित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. आता नाशिकमध्ये छगन भुजबळ यांच्या नाराजीचा विषयावर अजित पवार काय बोलणार? याकडे भुजबळ समर्थकांचे लक्ष लागले आहे.