सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवार यांची पाठराखण, म्हणाल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रत्येकाला अधिकार

| Updated on: Jan 04, 2023 | 7:05 PM

ईडी सरकारने मीडियाशी बोलण्याऐवजी आंदोलनकर्त्यांशी बोलायला हवं. एखाद्या दिवशी प्रसिद्धी मिळाली नाही तर काय बिघडले का?

सुप्रिया सुळे यांच्याकडून अजित पवार यांची पाठराखण, म्हणाल्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रत्येकाला अधिकार
सुप्रिया सुळे, खासदार
Follow us on

पुणे : संभाजी महाराज हे स्वातंत्र्यरक्षक आहेत. धर्मवीर नव्हे, असं मत विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले. त्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर टीकेची राळ उठविली. संभाजी महाराज हे धर्मवीरही होते, असं म्हणत भाजपनं अजित पवारांविरोधात आंदोलन केलं. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आपल्या संविधानात प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. तो अधिकार असल्यानं त्यात गैर काय? संविधानात मनमोकळेपणाने बोलण्याचा प्रत्येकाला अधिकार दिलाय. मग ते बोलतायेत त्यात गैर काय. तुमच्या सर्वांच्या चॅनेलवर चंद्रकांत पाटील जे बोलले ते दाखवा. मग पवार साहेब त्यावर नक्की प्रतिक्रिया देतील.

उर्फी जावेद आणि चित्रा वाघ प्रकरणावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अशावेळी कैलासवासी अरुण जेटली मला आठवतात. तुम्ही दाखवणं बंद करा. लोकं बोलणं बंद करतील. राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व पक्षांना आवाहन आहे, आपल्या गलिच्छ राजकारणासाठी, कोणत्याही विषयासाठी महिलेविषयी कोणीही बोलू नये.

महाराष्ट्राची परंपरा आहे. सामाजिक परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून होते. त्यामुळं या सर्वांचा विचार करून स्वतःला आवरलं पाहिजे. मला जनतेनं निवडून दिलं ते त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी. महाराष्ट्रात महागाई, बेरोजगारी आणि विजेचा तुटवडा हे प्रामुख्याने आव्हान आहेत. याकडे सर्वांनी लक्ष द्यायला हवं, असा सल्लाही सुप्रिया सुळे यांनी दिला.

ईडी सरकारने मीडियाशी बोलण्याऐवजी आंदोलनकर्त्यांशी बोलायला हवं. एखाद्या दिवशी प्रसिद्धी मिळाली नाही तर काय बिघडले का? रोज टीव्हीवर कशाला यायला हवं. मुख्य मागणीला बगल द्यायचं. हेच तर सुरुय. असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.