सर्वात मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा यापुढे ऑफलाईन, सगळी रिक्त पदंही भरणार
सर्वात मोठी बातमी! MPSC च्या सर्व परीक्षा यापुढे ऑफलाईन, सगळी रिक्त पदंही भरणार all mpsc exams will be conducted offline onwards devendra fadnavis decision

MPSC Exam Offline : एमपीएससीकडून आयोजित केल्या जाणाऱ्या परीक्षांचा मुद्दा सध्या राज्यात चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. एमपीएससीच्या अनेक परीक्षांमध्ये पेपरफुटी झाली, असा आरोप केला जातोय. विशेष म्हणजे काही प्रकरणात आमची चूक झाली, असं मान्य आयोगाने तसेच सरकारने अप्रत्यक्षणे मान्य केलेलं आहे. त्यानंतर आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी तसेच विरोधक करत आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार हेदेखील या मागणीसाठी आग्रही आहेत. दरम्यान, आता आंदोलक विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्याचे मान्य केल्याचे या विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यापुढे एमपीएससीच्या सर्व परीक्षा या ऑफलाईन घेतल्या जातील, असे आश्वासन फडणवीस यांनी दिलेय.
मुख्यमंत्र्यांनी कोणत्या मागण्या मान्य केल्या?
मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमपीएससी सचिव महेंद्र हरपाळकर यांच्या बदलीचे विद्यार्थ्यांना आश्वासन दिले आहे. सोबत एमपीएससीच्या सर्व परीक्षा यापुढे आॅफलाइन पद्धतीने घेण्यात येतील, असेही आश्वासन त्यांनी दिले आहे. सर्व रिक्त पदे लवकरच भरले जातील. परीक्षेसंदर्भात सिंगल कार्ड यंत्रणादेखील उभी जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.
तीन महिने न्यायालयीन चौकशी होणार
मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आमची मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक सकारात्मक झाली. एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याबत बैठकीत स्पष्टता झाली.. काही अधिकाऱ्यांची 3 महिन्यात चौकशी होणार आहे, असे या विद्यार्थ्याने सांगितले. तसेच येत्या 2 ऑक्टोबर रोजी पुण्यात होणारे आंदोलन स्थगित करण्यात येईल असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. अध्यक्षांचा राजीनामा होण्यापूर्वी 3 महिने न्यायालयीन चौकशी होणार, सचिवांची बदली होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी असे आश्वासन दिल्याचीही माहिती या विद्यार्थ्यांनी दिली.
दरम्यान, आता या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. आगामी काळात एमपीएससीमध्ये नेमके काय काय बदल केले जातील? रिक्त जागांच्या भरतीची जाहिरात नेमकी कधी निघणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
