Pune Nasrapur Case : संतापजनक नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा कायद्यात बदल करण्याचा मोठा निर्णय

पुणे जिल्ह्यातील नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सराकरने एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच त्यासाठी कायद्यात बदल केला जाणार आहे.

Pune Nasrapur Case : संतापजनक नसरापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर फडणवीस सरकारचा कायद्यात बदल करण्याचा मोठा निर्णय
Pune Nasrapur Case
| Updated on: May 05, 2026 | 1:37 PM

सध्या सगळ्या राज्यात नसरापूर घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचा वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात नसरापूर आहे. या नसरापूरमध्ये एका साडेतीन वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी 1 मे रोजी उघडकीस आली. या घटनेनंतर खवळलेल्या ग्रामस्थांनी नसरापूरवरुन जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावरील वाहतूक रोखून धरली. मोठं आंदोलन केलं. शनिवारी मोर्चा काढून कडकडीत बंद पाळला. आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या नसरापूर घटनेवर चर्चा झाली. नसरापूर मधील घटनेच्या संदर्भात आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. लैंगिक शोषणातील आरोपींना पॅरोल मिळू नये, यासाठी फडणवीस सरकार कायद्यात बदल करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कॅबिनेट बैठकीत निर्देश. विधी व न्याय विभागाला मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश.

या प्रकरणात आरोपी भीमराव कांबळेला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला 7 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्याविरुद्ध हत्या, बलात्कार, बालकांना लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण देणाऱ्या (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 65 वर्षीय भीमराव कांबळेविरोधात याआधीही विनयभंग आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता.

शेणाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह लपवून ठेवला

आरोपीने दगडाने ठेचून चिमुकलीला ठार मारलं. त्यानंतर त्याने शेणाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह लपवून ठेवला. अंगावर काटा आणणारी ही घटना आहे. या घटनेनंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

SIT स्थापन करण्यात आली

या प्रकरणात SIT स्थापन करण्यात आली आहे. विविध साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले जात आहेत. सोलापुरात नसरापूर घटनेच्या निषेधार्थ कॅण्डल मोर्चा काढण्यात आला. नसरापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूरकर रस्त्यावर उतरले आहेत. याआधी देखील त्याने महिलांसोबत वाईट कृत्य केलं आहे. दोन प्रकरणातून तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आरोपी भीमराव कांबळेने पुन्हा असा गुन्हा केला. म्हणून पॅरोलवर अशा आरोपींची सुटका होऊ नये यासाठी कायद्यात बदल करणं गरजेच आहे.

 

Follow Us