मोठी बातमी! विलिनीकरणाची चर्चा सुरू असतानाच सिल्व्हर ओकवर घडामोडींना वेग, शरद पवार गटाचे बडे नेते दाखल
शरद पवार यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर ते आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आले आहे. शरद पवार सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल होताच आता घडामोडींना वेग आला आहे.

राजीकय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार रुग्णालयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान त्यानंतर आता शरद पवार यांना रुग्णालयातून डिसचार्ज मिळाल्यानंतर ते आपल्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी आले आहे. शरद पवार सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल होताच आता घडामोडींना वेग आला आहे. शरद पवार यांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. ज्यामध्ये जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख, शशिकांत शिंदे यांचा समावेश आहे. शरद पवार यांना भेटण्यासाठी हे नेते सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत.
दरम्यान सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते पार्थ पवार देखील सिल्व्हर ओकवर दाखल झाले आहेत. पार्थ पवार देखील शरद पवार यांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झाल्याने घडामोडींना वेग आला आहे.